डिझाईनस्पार्क पीसीबी

(डिझाइन स्पार्क पीसीबी या पानावरून पुनर्निर्देशित)

डिझाइन स्पार्क पीसीबी(छापिल परिपथ फलक-प्रिंटेड सर्किट बोर्ड -PCB) हे शिक्षक, विद्यार्थी आणि हौशी लोकांसाठी बनवलेले एक मोफत पीसीबी स्केमॅटिक कॅप्चर(PCB Schematic capture) आणि पीसीबी लेआऊट (PCB layout)साधन आहे जे इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन(Electronic Design Automation -EDA) या प्रकारा अंतर्गत येते. EDA सॉफ्टवेर(संचेतन) हे पुन्हा कंप्युटर एडेड डिझाईन(Computer Aided Design -CAD) या प्रकारात समाविष्ट होतात. हे सॉफ्टवेर(संचेतन) पूर्णपणे मोफत असले तरी ते तुम्हाला पूर्ण क्षमतेने वापरता यावे यासाठी तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन मोफत नोंदणी करून घ्यावी लागते. याशिवाय हे सॉफ्टवेर(संचेतन) वापरताना हे लक्षात घ्यावे लागते कि अगदी सुरुवातीला तुम्हाला एक जाहिराती दिसू शकते जी बऱ्याचदा पीसीबी डिझाईन या विषयाशी निगडीत असते.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


हे सॉफ्टवेर(संचेतन) वापरताना एक विशेष महत्त्वाची सूचना अशी आहे कि डिझाईन स्पार्क पीसीबीच्या प्रोजेक्ट फाईल्स(म्हणजे तुम्ही काम करत असलेल्या प्रकल्पाचे दस्तऐवज) या Remote Network वर जतन करण्याऐवजी त्या स्थानिक संगणकावर (लोकल कंप्युटर अर्थात ज्या संगणकावर तुम्ही काम करत आहात) तेथेच जतन कराव्यात.