टिमोथी मायकल केन (इंग्लिश: Timothy Michael "Tim" Kaine, जन्म: २२ जून १९४९) हा एक अमेरिकन वकील, राजकारणी व विद्यमान सेनेटर आहे. २००६ ते २०१० दरम्यान व्हर्जिनिया राज्याच्या राज्यपालपदावर असलेला केन २०१२ साली अमेरिकन सेनेटवर निवडून आला. नोव्हेंबर २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवार हिलरी क्लिंटनने उपाध्यक्षपदासाठी केनची निवड केली आहे. क्लिंटन-केन जोडगोळीचा सामना प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाच्या डॉनल्ड ट्रम्प-माइक पेन्स ह्या जोडीसोबत झाला. या निवडणुकीत क्लिंटन-केनला मताधिक्य मिळाले परंतु इलेक्टोरल कॉलेजमधील मतविभागणीत पराभव झाल्याने ट्रम्प-पेन्स हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष झाले.

टिम केन
Tim Kaine

विद्यमान
पदग्रहण
३ जानेवारी, २०१३
मार्क वॉर्नरच्या समेत
मागील जिम वेब

व्हर्जिनियाचा ७०वा राज्यपाल
कार्यकाळ
१४ जानेवारी २००६ – १६ जानेवारी २०१०

रिचमंड शहराचा महापौर
कार्यकाळ
१ जुलै १९९८ – १० सप्टेंबर २००१

जन्म २६ फेब्रुवारी, १९५८ (1958-02-26) (वय: ६६)
सेंट पॉल, मिनेसोटा
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक
गुरुकुल हार्वर्ड विद्यापीठ
धर्म रोमन कॅथलिक
सही टिम केनयांची सही

मिनेसोटाच्या सेंट पॉल शहरात जन्मलेला व कॅन्सस सिटी महानगरात वाढलेला केन पेशाने वकील असून त्याने हार्वर्ड विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले. डेमोक्रॅटिक पक्षात केन मवाळ विचारांचा मानला जातो व त्याच्या राजकीय धोरणांची तुलना विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन ह्याच्यासोबत केली जाते.

बाह्य दुवे संपादन