झोंबी

आनंद यादव लिखित आत्मचरित्रात्मक कादंबरी

झोंबी ही मराठी लेखक आनंद यादव यांनी लिहलेली आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. पु.ल. देशपांडे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहलेली असून या पुस्तकानंतरचे नांगरणी, घरभिंती , आणि काचवेल हे तीन भाग प्रसिद्ध झालेले आहेत. शाळेत जाऊन शिकण्यासाठीची आनंद यादव यांची धडपड आणि शाळा शिकू न देण्यासाठी त्यांच्या वडिलांनी दिलेला मार आणि त्यांचे या काळातले इतर अनुभव आणि त्यांचे शाळा आणि शिक्षकांबद्दलचे विचार या कादंबरीत आहेत.

झोंबी
लेखक आनंद यादव
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रथमावृत्ती १९८७
मुखपृष्ठकार चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठसंख्या ३७२
आय.एस.बी.एन. ८१-७७६६-३९२-५

पूर्वप्रसिद्धी संपादन

झोंबी या पुस्तकातील काही भाग 'रसिक' (१९८०),(१९८१) तसेच 'बागेश्री' (१९८२) या नियतकालिकांच्या दिवाळी अंकातून पूर्वी प्रसिद्ध झालेला होता.

अनुवाद संपादन

या पुस्तकाचे हिंदी, कन्नड आणि बंगाली भाषेत अनुवाद झालेले आहेत.

पुरस्कार संपादन

झोंबी या पुस्तकाला खालील पुरस्कार मिळालेले आहेत.

संदर्भ संपादन