जेनीलिया डिसूझा (ऑगस्ट ५ इ.स. १९८७; मुंबई ,महाराष्ट्र - हयात) (तमिळ :ஜெனிலியா ; तेलुगू: జెనీలియా ; रोमन लिपी: Genelia D'Souza) या भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. तेलुगू चित्रपटातील त्या एक आघाडीच्या नायिका आहेत. तेलुगू खेरीज त्यांनी तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतूनदेखील अभिनय केला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या मस्ती, फोर्स, तेरे नाल लव हो गया अशा अनेक चित्रपटामधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. फेब्रुवारी २०१२ मध्ये अभिनेते रितेश देशमुख यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. इ.स. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या लई भारी (चित्रपट) चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.

जेनेलिया डिसूझा
जेनेलिया डिसूझा (जून, इ.स. २०१२मध्ये)
जन्म ऑगस्ट ५ इ.स. १९८७
मुंबई ,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय)
भाषा तमिळ, तेलुगू, हिंदी, मराठी
प्रमुख चित्रपट तुझे मेरी कसम, बोमारीलू, फोर्स
वडील नील डिसुझा
आई जीनेट डिसुझा
पती रितेश देशमुख
अपत्ये

चित्रपट कारकीर्द संपादन

वर्ष (इ.स.) चित्रपट भूमिका भाषा टिप्पण्या
इ.स. २००३ तुझे मेरी कसम अंजली ऊर्फ अंजू हिंदी
बॉय्ज हरिणी तमिळ
सत्यम अंकिता तेलुगू
इ.स. २००४ मस्ती बिंदिया हिंदी
साय इंदू तेलुगू
सांबा संध्या तेलुगू
इ.स. २००५ ना अल्लुडू गगना तेलुगू
सचिन शालिनी तमिळ
सुभाषचंद्र बोस अनिता तेलुगू
इ.स. २००६ हॅपी मधुमती तेलुगू
राम लक्ष्मी तेलुगू
बोम्मारिल्लू हासिनी तेलुगू पुरस्कारविजेती, विशेष परीक्षकांचा नंदी पुरस्कार
पुरस्कारविजेती, फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (तेलुगू)
पुरस्कारविजेती, संतोषम् सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार
चेन्नई कादल नर्मदा तमिळ
इ.स. २००७ धी पूजा तेलुगू
इ.स. २००८ मि. मेधावी श्वेता तेलुगू
सत्या इन लव्ह वेदा कन्नड
संतोष सुब्रमण्यम् हासिनी तमिळ नामांकन, फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (तमिळ)
मेरे बाप पहले आप शिखा कपूर हिंदी
रेडी पूजा तेलुगू
जाने तू या जाने ना अदिती महंत हिंदी
किंग स्वतः (जेनेलिया डिसूझा) तेलुगू पाहुणी कलाकार म्हणून

बाह्य दुवे संपादन