चेन्ला हे कंबोडियातील एक प्राचीन राज्य होते.

(इ.स. ५५० - सुमारे ८ वे शतक) चेन्लाचा सर्वप्रथम उल्लेख चिनी दस्तावैजात फुनानचे मांडलिक राज्य म्हणून आढळतो. इ.स. ५५०च्या सुमारास चेन्ला राज्य फुनान पासून वेगळे होऊन स्वतंत्र झाले. त्यानंतर ६० वर्षांत त्यांनी फुनान बळकावले. इशानपूर ही चेन्ला राज्याची पहिली राजधानी मानली जाते. या शासकांनीही हिंदू संस्कृतीचा अंगिकार केला. पुढे या राज्याचे अनेक तुकडे पडून एकछत्री अंमल नाहीसा झाला.