चिनी ताइपेइ हे नाव चीनचे प्रजासत्ताक (तैवान) हा देश ऑलिंपिक स्पर्धा, आशियाई खेळ, फिफा विश्वचषक इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या संघाचे वर्णन करण्यासाठी वापरतो. तैवानचे राजकीय अस्तित्व वादग्रस्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तैवान अथवा चीनचे प्रजासत्ताक ही नावे वापरण्यास चीन देशाचा विरोध आहे. ह्यामुळे चीन व तैवान ह्या दोन्ही देशांनी सहमत होऊन चिनी ताइपेइ हे नाव वापरण्याचे ठरवले. १९७९ मध्ये झालेल्या एका ठरावादरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने तैवानला चिनी ताइपेइ हे नाव दिले.

चिनी ताइपेइ ऑलिंपिक ध्वज
चीनच्या प्रजासत्ताकाचा ध्वज
चिनी ताइपेइ पॅराऑलिंपिक ध्वज

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन