चर्नी रोड तथा राजा राममोहन रॉय मार्ग हा मुंबईतील एक प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता गिरगांव चर्चपाशी सुरू होतो आणि वल्लभभाई पटेल रोडला मिळाल्यावर संपतो. याच रस्त्यावर राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या प्रार्थना समाजाचे सभागृह आहे.

चर्नी रोड is located in मुंबई
चर्नी रोड
चर्नी रोड
चर्नी रोड

या रस्त्याजवळच चर्नी रोड नावाचे मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानकही आहे. (Charni Road - Old spellings: Churney Road and Charney Road) या स्थानकाला गिरगांव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे चरणी रोड अथवा चर्नी रोड असे नाव देण्यात आले. इ.स. १८४८ च्या सुमारास तेव्हाच्या ब्रिटिश शासकांनी मुंबईमधील कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणे सुरू केले. हे देण्याची ऐपत नसल्याने गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी सर जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वतःचे २०,००० रुपये खर्चून ठाकुरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्यावरील जमीन विकत घेतली व तेथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा दिली. या चरणींच्या जवळ असल्यामुळे या इ.स. १८६७मध्ये बांधलेल्या स्थानकाचे नाव चरणी रोड असे ठेवण्यात आले. मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब. पु.बा.जोशी म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले. चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.

बहुतेक सगळ्या जलद किंवा मंद गतीच्या लोकल गाड्या चर्नी रोड स्थानकावर थांबतात.

जवळचे भाग संपादन

पंचरत्न इमारत - येथे मौल्यवान खड्यांच्या व्यापाऱ्यांची कार्यालये आहेत.

गिरगाव - हा मुंबईतील मराठी वस्तीचा भाग चर्नी रोड स्थानकाला लागून आहे. स्थानकाच्या पूर्वेला गिरगाव तर पश्चिमेला चौपाटी आणि समुद्र आहे.

शाळा, कॉलेज, इ. संपादन

चर्नी रोडच्या पश्चिमेला अरबी समुद्र किनारा आहे जो गिरगाव चौपाटी म्हणून ओळखला जातो. पश्चिमेला डावीकडे महाराष्ट्र सरकारचे शासकीय मुद्रणसंस्था असलेल्या पुस्तके, पाक्षिके,साप्ताहिके ह्यांचे विक्री केंद्र आहे. पश्चिमेलाच उजवीकडे थोड्या अंतरावर चांगल्या दर्जाची पोहण्याची सोय असलेला मफतलाल जिमखाना आहे. लगेचच गिरगाव चौपाटीवर स्वातंत्र्यसैनिक प्रखर राष्ट्रवादी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.

चौपाटीहून पुढे गेल्यावर उजवीकडे विल्सन महाविद्यालय लागते. बाजूलाच जिमखाना व रस्त्याच्या पलीकडे समोरच महाविद्यालयाचे वसतिगृह आहे. महाविद्यालयाला लागूनच उजवीकडे जाणारा रस्ता ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकाकडे जातो तर चौपाटीला समांतरपणे जाणारा रस्ता वाळकेश्वरकडे जातो. वाळकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लगेचच उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने पुरातन वाळुकेश्वर शिवमंदिराकडे जाता येते. वाळकेश्वर रस्त्याने पुढे तीनबत्तीनंतर खाली उजवीकडे गेल्यावर बाणगंगा तलावशिवमंदिर लागते तर सरळ डावीकडे राजभवन लागते. तीनबत्ती चौकाच्या डाव्या बाजूला अगदी समोर सुप्रसिद्ध पंजाबी चंदू हलवाई हे मिठाईचे दुकान आहे.बाजूलाच शाखेच्या उजवीकडे सुप्रसिद्ध नटी शास्त्रीय नृत्य नर्तकी आशा पारेख ह्यांनी बांधलेल्या मंदिरात सुबक गणपतीची मूर्ती विराजमान आहे.

तीनबत्तीच्या वर उजवीकडे गेल्यास मलबार हिलचा भाग चालू होतो. कमला नेहरू बाग, म्हातारीचे बूट हाऊस ही पर्यटन ठिकाणे येथे आहेत. गिरगाव चौपाटीचे विहंगम दृश्य येथून अनुभवयास मिळते.

हे सुद्धा पहा संपादन