गीता प्रेस

भारतातील अग्रगण्य प्रकाशन संस्था

गीता प्रेस ही भारतातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे. यास गीता मुद्रणालय या नावाने ही जाणले जाते. ही संस्था उत्तर प्रदेश याज्यातील गोरखपुर शहरात धार्मिक पुस्तकांचे मुद्रण आणि प्रकाशन यांचे कार्य करते. गीता प्रेस लक्षावधी पुस्तके निर्माण करते. सर्वाधिक ऐतिहासिक पौराणिक आणि हिंदू धार्मिक पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून "गीता प्रेस‘ जगभर ओळखली जाते. या प्रकाशनाने प्रकाशित केलेली रामचरितमानस आणि भगवद्‌गीता घराघरात पोहोचली आहे.

गीता प्रेस स्टॉल स्थान कानपुर रेल्वे स्थानक

स्थापना संपादन

या प्रकाशनाची स्थापना इ.स. १९२३ साली गीतातज्ज्ञ जयदयाल गोयन्दका यांनी केली.[१]

वितरण संपादन

गीता प्रेस प्रकाशनांची विक्री वीस मोठ्या दुकानांद्वारे केली जाते. तसेच देशातील ४२ प्रमुख रेल्वे स्थानकांवरील पुस्तकांच्या दुकानाद्वारे आणि हजारो पुस्तक विक्रेत्यांमार्फत केली जाते. "गीता प्रेस‘ विविध नियतकालिकेही प्रकाशित केली जातात. त्यापैकी कल्याण मासिक या हिंदी भाषेत प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकाच्या दोन लाख तीस हजार प्रतींची दरमहा विक्री केली जाते. हे मासिक देशात तसेच विदेशांतही अत्यंत नाममात्र किंमतीत उपलब्ध करून दिले जाते.[२] गीता प्रेसच्या पुस्तकांना प्रचंड मागणी असल्याने अनेकदा मागणी पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुले हव्या असलेल्या पुस्तकांची मागणी अनेक महिने आधीच नोंदवणे योग्य असते.

प्रकाशनाची वैशिष्ट्ये संपादन

  • गीता प्रेस कोणतेही सरकारी अनुदान घेत नाही.
  • नफ्यासाठी गीता प्रेस काम करत नाही.
  • ५० हजार पुस्तके प्रतिदिन छापली जातात
  • आजवर सुमारे ५८ कोटी, २५ लाख पुस्तके प्रकाशित केली आहेत
  • अनेक भाषांत प्रकाशन - हिंदी, संस्कृत, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड़, मल्याळम, गुजराती, मराठी, बंगला, उडि़या, असमिया, गुरुमुखी, नेपाली आणि उर्दू भाषेत पुस्तकें प्रकाशित केली जातात.
  • गीता प्रेसची पुस्तके मुद्रणाच्या किंमतीपेक्षाही कमी किमतीत विकली जातात.

आधुनिक तंत्रज्ञान संपादन

मुद्रण आणि पुस्तक बांधणीसाठी गीता प्रेस ने २०१३ पासून मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण सुरू केले आहे. येथे आता आपोआप पुस्तक बांधणी करणारे आणि वेगवान छपाई करतील अशी यंत्रे बसवली जात् आहेत.

संबंधित संस्था संपादन

  • गीता भवन, हृषिकेश
  • ऋषिकुल्-ब्रह्मचर्य आश्रम् (वैदिक विद्यालय), चुरू, राजस्थान
  • आयुर्वेद संस्थान, हृषिकेश
  • गीताप्रेस सेवा दल (नैसर्गिक संकटात समाज सेवा करण्यासाठी)
  • हस्त-निर्मित वस्त्र विभाग
  1. ^ http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4764661531845648594&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150828&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%27%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%27%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6[permanent dead link]
  2. ^ http://gitapress.org/hindi/Subscribe_mag.htm