ह्या व्याधीमध्ये रोग्याच्या लाळग्रंथी ( Parotid Glands ) अचानक सुजतात. साधारणतः शिशीर व वसंत ऋतुमधे गालगुंड, गालफुगी रोगाची साथ येते.

गालफुगी झालेला मुलगा
गालगुंड, गालफुगी हा व्यापक प्रमाणात पसरणारा व्याधी असून जगामधे सर्वत्र आढळतो.

गालगुंड, गालफुगी रोग ५ ते १५ वर्षे वयाच्या मुलांमधे अधिक प्रमाणात आढळतो. परंतु कुठल्याही वयांमधे याची लागणं होऊ शकते. बालकांपेक्षा प्रौढ व्यक्तीमधे व्याधीची गंभीर लक्षणे निर्माण होतात. ९ महिण्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना हा व्याधी सहसा होत नाही.

स्त्रियाच्या तुलनेने पुरुषामधे गालगुंड, गालफुगी रोग अधिक प्रमाणात होतो. एकदा हा व्याधी होऊन गेल्यानंतर सहसा पुनः होत नाही. कारण त्या रोग्याच्या शरीरात ह्या व्याधीविरुद्ध प्रतिकार शक्ति निर्माण होते. मोठया शहरामधे हा व्याधी जास्त प्रमाणात पसरतो.

वर्णन संपादन

झपाट्याने संसर्ग होणारा हा आजार शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो. गालफुगी हा गोवराइतका संसर्गजन्य नाही. एके काळी गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार होता. सार्वत्रिक लसीकरणानंतर याचे प्रमाण कमी झाले आहे. चार ते सात या वयात तो साधारणपणे आढळतो. भारतातील दर एक लाख मुलांमधील त्याचे १९४१ मधील प्रमाण दररोज २५० नवे रुग्ण असे होते. गालफुगीच्या लसीचा वापर सुरू झाल्यानंतर हे प्रमाण ७६ एवढे कमी झाले. गालफुगीची लस प्रचलित झाल्याने गालफुगीच्या रुग्णामध्ये खूपच घट झाली. १९८७मध्ये काही राज्यांमध्ये गालफुगीच्या रुग्णामध्ये पाच पटीने वाढ झाली होती. याचे कारण शाळेमध्ये लसीकरणामध्ये झालेले दुर्लक्ष. १९९६ पासून शाळेतील मुलांमध्ये १००% लसीकरणाची मोहीम राबवल्याने सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल- यू एस )च्या रिपोर्ट प्रमाणे देशभरात फक्त ७५१ नवे रुग्ण आढळले. (दर पन्नास लाखात एक ).

गालफुगी, गालगुंड रोगाचा संचयकाळ १८ दिवसांचा असतो.

गालगुंड रोगाचा संचयकाळ म्हणजे काय?

गालगुंड रोगाचा संचयकाळ म्हणजे गालगुंड रोगाच्या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यापासून ते गालगुंड रोगाची लक्षणे निर्माण होईपर्यंतचा कालावधी.

कारण आणि लक्षणे संपादन

गालफुगी, गालगुंड कारणीभूत घटक – आर. एन. ए. मिक्झोव्हायरस पॅरॉटायडिटीज ( RNA Myxovirus – Parotiditis ) ह्या विषाणुची लागणंं झाल्यामुळे गालफुगी, गालगुंड व्याधी होतो.

पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या लाळेमधील विषाणूमुळे गालगुंड होतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकल्यामधून याचा प्रसार होतो. एकदा व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली म्हणजे बारा ते पंधरा दिवसाने गालगुंडाची लक्षणे दिसतात. संसर्गाची प्राथमिक लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूकना लागणे आणि निरुत्साह. कधी कधी संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये यातील कोणतेही लक्षण दिसत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा ते चोवीस तासात गालगुंड झाल्याचे आढळते. अन्न चावण्यास आणि गिळण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात आम्लयुक्त पदार्थ गिळताना अधिक त्रास होतो. ताप ४० सें (१०४ फॅ) पर्यंत असतो. दुसऱ्या दिवशी गालाची सूज वाढते. सातव्या दिवशी सूज पूर्णपणे उतरते. एकदा गालगुंड झाले म्हणजे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परत गालगुंडाचा त्रास होत नाही. बहुतेक रुग्णामध्ये होणारा आजार गुंतागुंतीशिवाय बरा होतो. आजार मोठ्या व्यक्तीस झाला म्हणजे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. १५% रुग्णामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा दाह- मेनेंजायटिस होतो.

गालफुगी, गालगुंड रोगाचा प्रसार कसा होतो? गालफुगी, गालगुंड व्याधीचा प्रसार प्रत्यक्ष संपर्क, तुषार संसर्ग, रुग्णांनी वापरलेल्या वस्तु इतरांंनी वापरल्यामुळे तसेच रोग्याच्या लाळेमुळे होतो. गालफुगी, गालगुंड व्याधीचा प्रसार नाकातील स्राव, शिंकणे, खोकणे, श्वासाद्वारे होतो.

मेंदूआवरण दाह गालगुंडाच्या लक्षणानंतर चार ते पाच दिवसात सुरू होतो. मान अवघडणे, उलट्या आणि गळून गेल्यासारखे वाटणे ही मेंदूदाहाची लक्षणे आहेत. ही बहुघा सात दिवसानी चालू होतात. मेंदूमध्ये कायमचा बिघाड सहसा होत नाही. गालगुंडाचा संसर्ग मेंदूमध्ये पसरल्यानंतर मेंदूआवरण दाह होतो. गालगुंड मेंदूदाहाची लक्षणे वेदनाना होणे, आकडी आणि अधिक ताप. मेंदूदाह गालगुंड होऊन दोन आठवड्यांनी होतो. गालगुंडानंतर झालेला मेंदूदाह बहुघा पूर्णपणे बरा होतो. पण बरे झाल्यानंतर झटके येणे बरेच दिवस राहते. दर शंभर रुग्णापैकी एका रुग्ण गालगुंड आजारात गुंतागुंतीमुळे मृत्यू पावतो.

वयात आलेल्या एक चतुर्थांश पुरुषामध्ये अंडकोशामध्ये मम्सची लक्षणे दिसतात. अंडकोशास आलेली सूज हे त्याचे लक्षण आहे. गालगुंड झाल्यानंतर सात दिवसात ही अवस्था सुरू होते. एका किंवा दोन्ही अंडकोशास आलेली सूज, तीव्र वेदना, ताप, मळमळ आणि डोकेदुखी सुरू होते.वेदना आणि सूज पाच ते सात दिवसात कमी होते पण अंडकोश कित्येक आठवडे संवेदनक्षम राहतात. कधीकधी मुलींना बीजांड दाह होतो पण त्याची लक्षणे पुरुषांपेक्षा कमी तीव्र असतात. २००२ मध्ये झालेल्या एका संशोधनात गालगुंड झालेल्या व्यक्तीमध्ये मोठ्या आतड्याचा दाह होण्याची शक्यता अधिक असते असे आढळून आले आहे. पण अजून यावर पूर्ण संशोधन झालेले नाही.

लक्षणे १ ) लाळग्रंथीमधे शोथ व वेदना –

एका बाजुला किंवा दोन्ही बाजुला लाळग्रंथीमधे शोथ व वेदना, कर्णमूलशूल, डोकेदुखी, मानदुखी इ लक्षणे निर्माण होतात.

२ ) ताप / ज्वर –

ताप १०१ ते १०२ डिग्री फॅरेनहिट, पर्यंंत ताप येतो.

३ ) गालावर व कानाच्या मुळाजवळ सूज असल्यामुळे येथील त्वचा ताणली जाते. त्यामुळे तोंड उघडतेवेळी त्रास होतो. ४ ) ८ ते १० दिवसाांमधे सूज नाहीशी होते. तसेच गालगुंड आजाराची इतर लक्षणे कमी होतात.

५ ) गालफुगी, गालगुंड रोगामधे काही रुग्णांमध्ये उपद्रव स्वरूपात वृषणग्रंथीवर दाह व सुज येणे ( Orchitis ), स्त्रीबिजांंडावर सुज व दाह (Ovaritis), अग्न्याशयावर सुज व दाह (Pancreatitis), ह्रदयाच्या पेशीवर सुज व दाह Myocarditis इ लक्षणे निर्माण होतात.

निदान संपादन

गालगुंडाची साथ आल्यास बाह्य लक्षणावरून गालगुंडाचे निदान त्वरित करता येते. डॉक्टर मुलाचे तापमान पाहून गालावरील त्वचेच्या स्थितीवरून गालाची अंतर्त्वचा पाहतात. लाळग्रंथीच्या नलिकांची तोंडे गालगुंड झाले असल्यास तांबड्या रंगाची होतात. सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले असल्याने मुख आरोग्य व्यवस्थित नसल्यास लालग्रंथीमध्ये जिवाणूंची वाढा होऊन लाळ नलिकाना सूज आल्याची शक्यता असते. त्यामुळे गालगुंडाचे व्यवस्थित निदान होण्याची गरज आहे. जिवाणूसंसर्ग झाला असल्यास प्रतिजैविकांचा डोस द्यावा लागतो. क्वचित लाळनलिकांची तोंडे कर्करोगामुळे बंद होतात. अशा वेळी आयोडीनचा वापर करावा लागतो. लाळग्रंथीमध्ये गालगुंड विषाणू आहे याची खात्री योग्य त्या चाचणीने करून घ्यावी लागते.

२००२ मध्ये लंडनमध्ये झालेल्या संशोधनातून गालगुंड विषाणू निदान करण्यासाठीची इम्युनोग्लोबिन-जी चाचणी विकसित करण्यात आली आहे. स्थानिक लोकसंख्येमध्ये लसीकरणाचे नेमके प्रमाण ठरविण्यासाठी या चाचण्यांचा उपयोग होतो.

उपचार संपादन

गालगुंड झाल्यानंतर आजारावर फारसे उपचारना करता तो आपोआप बरा होण्याची वाट पहातात. लक्षणावर उपचार करता येतात. गिळण्यास त्रास होत असल्याने रुग्णास अन्न आणि पाणी पुरेशा प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. नाहीतर शुष्कता येण्याची शक्यता आहे. रुग्णास मऊ खाण्यास सोपे पदार्थ द्यावेत.शिजवलेला मऊ भात, उकडलेले बटाटे, सूप, बेबी फूड, मिक्सरमधून काढलेली लापशी वगैरे. अ‍ॅस्पिरिन, असिटॅमिनोफेन, आयब्युप्रोफेन आदींमुळे सूज , डोकेदुखी, आणि तापामुळे झालेल्या वेदना कमी होतात. फळांचे रस टाळावेत. दूघ आणि दुधाचे पदार्थ देऊ नयेत. ते पचण्याच्या दृष्टीने कठीण असतात. गुंतागुंत झाल्यास डॉक्टरांना भेटावे. अंडकोशास सूज आल्यानंतर त्वरित डॉक्टरी सल्ला घ्यावा. कापसाच्या घड्या अंडकोशाखाली ठेवून मांड्याना चिकटपट्टीने चिकटवल्यास आराम मिळतो. आइस पॅकने वेदना कमी होतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने विषाणू प्रतीरोधी औषधे दिली जाऊ शकतात.

गालफुगी, गालगुंडच्या पट्टी वर दाह व सूज कमी करणाऱ्या औषधांचा लेप केलेला असतो.

गालफुगी, गालगुंडच्या पट्टीच्या वापराने गालफुगी, गालगुंडची लक्षणे त्रास कमी होण्यास मदत होते.

गालफुगी, गालगुंडची पट्टी कशी वापरावी? How to use Belladonna Plaster for Mumps in Marathi ?

१ ) गालफुगी, गालगुंड पट्टीवरील छिद्र नसलेला कागद काढूण टाकावा.

२ ) गालफुगी, गालगुंड पट्टीचा गोल छिद्र असणारा भाग गालफुगी, गालगुंड वर लावण्यास वापरावा.

३ ) गालफुगी, गालगुंड झालेल्या, सुजलेल्या भागावर ही पट्टी योग्य प्रकारे चिकटवावी.

४ ) दुसऱ्या दिवशी जुनी पट्टी काढूण टाकावी व नवीन पट्टी चिकटवावी.

पर्यायी उपचार संपादन

सूज आलेल्या ग्रंथीवर अक्युप्रेशरचा उपयोग होतो. मधल्या बोटाने जबड्याचे हाड आणि कान यामधील जागा दोन मिनिटे दाबून दीर्घ श्वास घेतल्यास आराम मिळतो. होमिओपॅथीची अनेक औषधे गालगुंडावर देण्यात येतात. उदाहरणार्थ बेलॅडोना सूज, गाल लाल होणे, यावर परिणाम करते. ब्रायोनिया संवेदनक्षमता, अशक्तपणा किंवा तहान लागणे यासाठी, फायटोलॅक्का मोठ्या प्रमाणात ग्रंथीना सूज आली असल्यास वापरतात. मुलांना देण्यासाथी औषधांचे प्रमाण होमिओपॅथी प्रॅक्टिशनरच्या सल्ल्याने घ्यावे. एका दिवसात गुण आला नाही तर औषध थांबवावे. गालगुंड होऊ नये म्हणून मिळणारे प्रतिबंधक होमिओपॅथीचे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.

अनेक वनस्पतिजन्य औषधे गालगुंडासाठी वापरण्यात येतात. याने गालगुंड बरा होतो किंवा आजारामुळे होणारा त्रास कमी होतो. इचिनॅसिया शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगजंतूंचा प्रतिकार करण्यासाठी वापरतात. क्लेव्हर (गॅलियम अ‍ॅतपारिन ), कॅलॅन्डुला (कॅलॅन्डुला ऑफिसिनॅलिस) , आणि फायटोलॅक्का (पोक रूट) लसिकाग्रंथीवर परिणामकारक आहेत. फायटोलॅक्कामुळे विषबाधा होण्याची शक्यता असल्याने ते अनुभवी वैद्याच्या देखरेखीखाली घ्यावे. त्वचेवर वरून लावण्याची औषधे उदाहरणार्थ व्हिनेगार आणि कॅपसिकम फ्रुटेसेन्स मध्ये भिजवून गरम केलेला कपडा गालावर आणि मानेभोवती बाहेरून गुंडाळावा.

औदुंबराच्या खोडातून सूर्योदयापूर्वी पाझरणारा चीक लावला की गालगुंड बरा होतो.

पूर्वानुमान संपादन

गालगुंड झाल्याच्या निदानानंतर गुंतागुंतना झाल्यास फारशी काळजी करण्याचे कारण नाही. दोन आठवड्यानंतर आणखी एकदा गालगुंडाचा त्रास होण्याची शक्यता असते. पूर्ण बरे होईपर्यंत गुंतागुंत होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

गालफुगी, गालगुंड रोगामधे काही रुग्णांमध्ये उपद्रव स्वरूपात खालील आजार किंंवा लक्षणे दिसून येतात.

   वृषणग्रंथी शोथ (Orchitis ) – १५ ते ४० % पुरुषांमधे वृषणग्रंथीचा दाह होतो व तेथे सुज येते. ही लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण याच्यामुळे वंधत्व येऊ शकते.
   स्त्रीबिजांंडदाह (Ovaritis ) – ५ % मुलींमधे व स्त्रीयांमधे स्त्रीबिजांंडावर सुज येते व त्याचा दाह होतो. यावेळी पोटदुखी हे लक्षण प्रर्कषाने जाणवते ही लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण याच्यामुळे वंधत्व येऊ शकते.
   अग्न्याशयदाह (Pancreatitis ) – ४ % काही रुग्णांमधे अग्न्याशयावर सुज येते व त्याचा दाह होतो. यावेळी अचानक पोटदुखी हे लक्षण निर्माण होते, ही लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण याच्यामुळे वंधत्व येऊ शकते.
   ह्रदयदाह (Myocarditis) – ह्रदयाच्या पेशीवर सुज येते व त्यांचा दाह होतो. अशा वेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
   मस्तिष्क दाह (Encephalitis) – १ ते १० % रुग्णांमधे मेंंन्दूवर सुज येते.

प्रतिबंध संपादन

१ ) सूचना – Notification –

गालफुगी, गालगुंड व्याधीचा रुग्ण दिसताच आरोग्य विभागास कळवावे. २ ) पृथ्यकरण – Isolation –

गालफुगी, गालगुंड रोग्याच्या लाळग्रंथीला सूज आल्यापासून ५ दिवसपर्यत रुग्ण हा अतिसंक्रामक असतो त्यामुळे गालफुगी, गालगुंडच्या रुग्णाला ५ दिवसपर्यत इतर निरोगी व्यक्तींपासून वेगळे ठेवावे. ३ ) गालगुंड लसीकरण – Mumps Vaccination in Marathi –

एम. एम. आर. ( MMR ) ही लस गालफुगी, गालगुंड किंवा Mumps ह्या व्याधीसाठी दिली जाते.

   एम. एम. आर. ( MMR ) लसीचा १ला डोस बाळाचे वय १ वर्ष ते सव्वा वर्ष या दरम्यान असताना द्यावा. १ वर्षानंतर अर्धा मि. ली. ह्या मात्रेत इंंन्जेक्शन द्वारे देतात.
   एम. एम. आर. ( MMR ) लसीचा २ला डोस बाळाचे वय ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.

एम. एम. आर. ( MMR ) लसीचे दोन्ही डोस वरील प्रमाणे घेतल्यास सहसा हा गालफुगी, गालगुंड रोग आयुष्यात कधीच होत नाही. समजा झालाच तर त्याची खुप सौम्य लक्षणे निर्माण होतात. गर्भवति स्त्रीला ही लस देत नाहीत.

४ ) विमंक्रमण – Disinfection –

गालफुगी, गालगुंड रोग्यांंनी वापरलेले कपडे, वस्तु, नाकातील आणि गळ्यातील आभूषने, यांचे विसंक्रमण करावे.

गालगुंड प्रतिबंधक लस घ्यावी. एमएमआर ही संयुक्त लस रुबेला, गोवर आणि गालगुंड यासाठी देण्यात येते. १२-१५ महिन्याच्या बालकांना, ४-६ वर्षांच्या आणि ११-१२ वर्षाच्या मुलांना प्रत्येकी एक डोस अशा प्रमाणात ती देण्यात येते. गालगुंड झाल्याचे नक्की ठाऊक नसलेल्या मुलांना लस द्यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची गरज आहे. सर्व जगभर गालगुंड हा आजार असल्याने प्रौढांनी परदेशी प्रवास करताना लसीकरण करून घ्यावे. गालगुंडाची लस अत्यंत परिणामकारक आहे. प्रत्येकास लसीकरणानंतर गालगुंडापासून संरक्षण मिळते. काही रुग्णाना गालगुंडाची लस देता येत नाही उदाहरणार्थ

  1. दिवस गेलेल्या गरोदर स्त्रिया. लसीकरणानंतर गर्भपाताची शक्यता. पण बाळामध्ये लसीकरणामुळे विकृति उत्पन्न होत नाही. ज्या स्त्रियाना गालगुंडाची लस दिली आहे त्यानी तीन महिन्यासाठी गरोदरपण लांबवावे .
  2. लस न घेतलेल्या व्यक्तीस गालगुंड झाल्यास त्याला लस देऊ नये. अर्थात गालगुंडाची साथ आल्यानंतर लक्षणे न दिसल्यास लसीकरण करून घ्यावे.
  3. ताप येणे, प्रारंभीच्या श्वासमार्गाचे आजार असल्यास आजार बरा होईपर्यंत लस घेऊ नये.
  4. गालगुंडाची लस कोंबडीच्या अंड्यामध्ये वाढवलेली असल्याने ज्या व्यक्तीना अंडे खाल्यानंतर घसा दुखणे, घशास सूज, श्वास घेण्यास अडथळा दिसल्यास लस घेऊ नये.
  5. प्रतिकार क्षमता क्षीण झालेल्या कॅन्सर प्रतिबंधक औषधे आणि उपचार घेणा-या रुग्णानी गालगुंड लस घेऊ नये.
  6. सीडीसीच्या प्रसिद्धीकरणाप्रमाणे जी मुले एचआयव्ही उपचार घेत आहेत आणि ज्याना गालगुंडाची लक्षणे दिसत नाहीत त्याना गालगुंड लस १५ महिन्यांनंतर देण्यात यावी.

संदर्भ संपादन