खंड्या

पाणथळ जागी आढळणारा पक्षी

खंड्या किंवा किलकिल्या (शास्त्रीय नाव : Halcyon smyrnensis ; इंग्लिश: White Breasted Kingfisher, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर) हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ राहणारा पक्षी आहे. हे पक्षी युरेशियात पसरलेला आहेत. तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून फिलिपिन्सपर्यंत आढळतो. लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे.

खंड्या
शास्त्रीय नाव हॅल्सायन स्मिर्मेन्सिस
(Halcyon smyrnensis)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश व्हाईट थ्रोटेड किंगफिशर
(White-throated Kingfisher)
संस्कृत चंद्रकांत
हिंदी श्वेतकण्ठ कौड़िल्ला

खंड्या हे सामान्य नाम असून या पक्षाच्या विविध जातींपैकी पांढऱ्या छातीच्या खंड्याला नुसते खंड्या या नावाने ओळखतात. याच्या इतर जातभाईंची नावे लहान खंड्या [श १], कवडा खंड्या [श २], काळ्या डोक्याचा खंड्या [श ३], तिबोटी खंड्या [श ४], घोंगी खंड्या [श ५], मलबारी खंड्या [श ६] अशी आहेत.

मराठी नावे संपादन

प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषा बदलत जाते, याचे पक्षी-विश्वाशी निगडित उत्तम उदाहरण म्हणजे खंड्या पक्षी. किंगफिशर या पक्ष्याला काही लोक खंड्या म्हणतात, काही जण बंड्या, बंडू तर काही धीवर नाव सांगतात. पक्ष्यांची प्रमाण नावे शोधताना महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्याध्‍यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी या पक्ष्याला धीवर हे नाव दिले आहे. धीवर म्हणजे मासे पकडणारा. कोळी लोकांनाही धीवर म्हणतात. त्यामुळे आता खंड्या नाही; तर मराठीत धीवर या नावाने किंगफिशर ओळखला जाणार आहे. (१५-३-२०१५ची बातमी)

पारिभाषिक शब्दसूची संपादन

  1. ^ लहान खंड्या (इंग्लिश: Small Blue, स्मॉल ब्लू)
  2. ^ कवडा खंड्या (इंग्लिश: Indian Pied इंडियन पाईड)
  3. ^ काळ्या डोक्याचा खंड्या (इंग्लिश: Black Capped, ब्लॅक कॅप्ड)
  4. ^ तिबोटी खंड्या (इंग्लिश: Indian Threetoed, इंडियन थ्रीटोड)
  5. ^ घोंगी खंड्या (इंग्लिश: Brownheaded Storkbilled, ब्राउनहेडेड स्टॉर्कबिल्ड)
  6. ^ मलबारी खंड्या (इंग्लिश: Malabar Whitecollared, मलबार व्हाइट कॉलर्ड)