क्वेसार (इंग्रजी: Quasar) किंवा क्वाझी स्टेलार रेडिओ स्रोत हे सक्रिय दीर्घिकीय केंद्रके या वर्गातील वस्तूंमधले सर्वात शक्तिशाली आणि दूरवरचे सदस्य आहेत. क्वेसार अत्यंत तेजस्वी असतात. ते सुरुवातीला दीर्घिकांसारख्या विस्तृत स्रोतांऐवजी उच्च ताम्रसृतीवरील विद्युतचुंबकीय ऊर्जेचे ताऱ्यांसारखे स्रोत म्हणून ओळखले गेले. म्हणून त्यांना क्वाझी स्टेलार असे नाव पडले. क्वेसारची तेजस्विता आकाशगंगेपेक्षा १०० पट जास्त असू शकते.[२] या वस्तूंचे खरे स्वरूप १९८० पर्यंत माहीत नव्हते. परंतु आता वैज्ञानिक समुदायात असे मानले जाते की क्वेसार हा प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर केंद्रस्थानी असलेल्या दीर्घिकेच्या केंद्रकाजवळचा दाट भाग आहे.[३]

कलाकार निर्मित ULAS J1120+0641 या अतिशय दूरच्या क्वेसारची प्रतिमा, ज्याला सूर्याच्या दोनशे कोटि पट वस्तूमानाच्या कृष्णविवरापासून ऊर्जा मिळते.[१] Credit: ESO/M. Kornmesser

संदर्भ संपादन

  1. ^ "Most Distant Quasar Found". ESO Science Release (इंग्रजी भाषेत). 4 July 2011 रोजी पाहिले.
  2. ^ Greenstein, Jesse L.; Schmidt, Maarten (1964). "The Quasi-Stellar Radio Sources 3C 48 and 3C 273". The Astrophysics Journal (इंग्रजी भाषेत). 140: 1. Bibcode:1964ApJ...140....1G. doi:10.1086/147889.
  3. ^ इरिअन, रॉबर्ट. "A Quasar in Every Galaxy?" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-21. १९ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.