केदारनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यामधील एक लहान गाव आहे. केदारनाथ येथील अतिप्राचीन केदारनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर भारतामधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.

केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड ह्या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते.

[[वर्ग:[permanent dead link] केदारनाथ पर्यटन माहिती]]