कॅनडा मध्ये भांग

कॅनडामध्ये गांजाचा वापर

कॅनडामध्ये भांगेचे (मॅरिहुआना) सेवन करणे वैद्यकीय कारणांसाठी कायदेशीर आहे. ऑक्टोबर २०१८पासून कोणत्याही कारणासाठी किंवा कारणाशिवाय कॅनडामध्ये भांग वापरणे कायदेशीर ठरेल. अशी परवानगी असणारा कॅनडा हा उरुग्वेनंतरचा दुसरा देश असेल. नेदरलॅंड्समध्ये अशी कायदेशीर परवानगी नसली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

कॅनडा मधील "भांग" दिवस, २०१४

कॅनडामध्ये १९२३ साली भांगेवर बंदी घातली गेली. २००१मध्ये वैद्यकीय वापरासाठी मुभा दिली गेली. २०१५ च्या निवडणूक प्रचारादरम्यान लिबरल पार्टीचे नेते व पंतप्रधान जस्टिन त्रुदो यांनी भांग कायदेशीर करण्याचे वचन दिले होते. सत्तेवर आल्यावर हे वचन पूर्ण केले.

जरी भांगेचे सेवन कायदेशीर होणार असेल तरीही अल्पवयीन व्यक्तींना भांग पुरवणाऱ्यांना आणि भांग घेउन मोटारवाहन चालविणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई आणि शिक्षा करणारे कायदेही केले गेले आहेत.