कवठे येमाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?कवठे येमाई

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१७° ४८′ ०३.२४″ N, ७५° ५३′ २७.६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिरूर
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भोगोलिक स्थान आणि लोकसंख्या संपादन

कवठे हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ५८१४ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. त्याच्या सर्वात जवळचे शहर शिरूर हे २८ किलोमीटर अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार कवठे गावात १३९२ कुटुंबे असून, ३६३७ पुरुष आणि ३५४७ स्त्रियांसह गावाची एकूण लोकसंख्या ७१८४ आहे. गावात अनुसूचित जातीचे ४०८ जण असून, अनुसूचित जमातीचे १९२ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५५५५६९ [१] आहे.

कला आणि कलावंत संपादन

कवठे गाव हे ऐतेहासिक वारसा लाभलेले गाव असून येथे मराठा सरदार श्रीमंत पवार यांनी अठराव्या शतकात उभारलेली आणि अजून ही सुस्थितीत असलली एक गढी (राजवाडा) आहे. साहजिकच, कला आणि कलावंतांना प्रोत्साहन देणारे हे गाव महाराष्ट्र राज्यात आपलं एक वेगळे स्थान टिकवून आहे. प्रसिद्ध तमाशा कलावंत भाऊ बापू मांग नारायणगावकर, विठ्ठल कवठेकर, बी.के.मोमीन कवठेकर ,गंगाराम बुआ रेणके अशी नामवंत तमाशा कलाकार, फड मालक या मातीत जन्मले आणि प्रसिद्ध पावले. आपल्या शृंगारिक लावण्यांसाठी आणि लोकजागृती करणाऱ्या लघुनाट्य लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन (कवठेकर) हे सुद्धा याच गावचे.[२]महाराष्ट्र शासना तर्फे तमाशा कला क्षेत्रासाठी दिला जाणारा सर्वोच्च असा 'विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' मिळवणारे दोन दिग्गज श्री गंगाराम रेणके आणि लोकशाहीर बी. के. मोमीन उर्फ बशीर मोमीन (कवठेकर) यांची ही कर्मभूमी.

साक्षरता संपादन

  • गावाची एकूण साक्षर लोकसंख्या: ४९१० (६८.३५%)
  • गावातील साक्षर पुरुषांची संख्या: २७३२ (७५.१२%)
  • गावातील साक्षर स्त्रियांची संख्या: २१७८ (६१.४%)

हवामान संपादन

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन संपादन

येथील समाज हा शेती, शेती वर आधारित उद्योग आणि दुग्ध व्यवसायात आघाडीवर आहे. गावात सामजिक एकोपा आणि सलोखा वाखाणण्याजोगा आहे. गावात एक गाव एक गणपती यासारखे उपक्रम राबवले जातात. गावातील तरुण हे क्रीडा, कला या क्षेत्रात हिरहिरीने भाग घेतात. राजाराम महाराजांच्या संघर्षावर आधारित, संताजी - धनाजी यांच्या शौर्याचे प्रतिबिंब दाखवणारे "भंगले स्वप्न महाराष्ट्रा" तसेच प्रतापराव गुर्जर यांच्या जीवनावरील "वेडात मराठे वीर दौडले सात" ही बशीर मोमीन कवठेकर लिखित दोन ऐतिहासिक नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग याच कवठे गावात करण्यात आले.

प्रेक्षणीय स्थळे संपादन

 
The Gadhi fort in Kavathe Yamai.


 
Vedat Marathe Veer Daudale Saat Drama 1st Show 1977


धार संस्थांचे राजे, मराठा सेनापती आनंदराव पवार यांनी येथे तटबंदीसह गाव वसवले. एक मोठा राजवाडा बांधल्यानंतर हे गाव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे बनले. 18व्या शतकात पवार घराण्याने बांधलेला राजवाडा, तसेच हेमाडपंथी शैलीतील विविध मंदिरे यांचा समावेश सांस्कृतिक आणि ऐतिहासिक खुणांमध्ये आहे. हेमाडपंथी शैलीतील सुंदर मंदिरांमध्ये विठ्ठल मंदिर, गणेश मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर यांचा समावेश होतो. यमाई मंदिर, सायमाबा मंदिर, दत्त मंदिर आणि फत्तेश्वर मंदिर सर्वात प्रमुख आहेत.

फत्तेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण ते मराठ्यांनी हैदराबादच्या निजाम-उल-मुल्कचा लढाईत पराभाव केल्यानंतर एक विजयाची निशाणी म्हणून बांधले होते. फत्ते या शब्दाचा अर्थ "विजय" असा होतो. हे स्थानिक पातळीवर खार ओधा आणि घोडनदी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रवाहाच्या संगमावर वसलेले आहे.

वार्षिक उत्सव/यात्रेचे आयोजन गावांद्वारे केले जाते जेथे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भक्त सहभागी होतात. कोजागिरी पोर्णिमा पालखी मिरवणुकीसह साजरी केली जाते आणि त्यानंतर भजन-कीर्तन आणि मनोरंजनासाठी नाटक केले जाते. गावात भगवान महावीर (जैन)चे सुंदर मंदिर बांधलेले आहे. येथे एक मशीद आणि चार पिर दर्गा आहेत, ज्यांचे व्यवस्थापन स्थानिक मुस्लिम समुदाय करतात आणि येथे वार्षिक उरूस सुध्धा साजरा केला जातो. येथील सामजिक एकोपा आणि सलोखा वाखाणण्याजोगा आहे. "वेडात मराठे वीर दौडले सात" या बशीर मोमीन कवठेकर लिखित, प्रतापराव गुर्जर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हा 'वली पिर उरूसा' मध्ये १९७७ साली करण्यात आला. गावाला एकेकाळी तटबंदी होती परंतु वाढती लोकसंख्या, गावच्या सीमांचा विस्तार आणि देखभाल नसल्यामुळे भिंती आणि मोठे दरवाजे कोसळले आहेत.

नागरी सुविधा संपादन

जवळपासची गावे संपादन

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  1. ^ http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html
  2. ^ वैजयंती सिन्नरकर, [शब्दगंध : लोककला - तमाशा], "दै. देशदूत, नाशिक, 01-Oct-2023"