एरबस ए३५० हे एरबस कंपनीने विकसित केलेले मोठ्या क्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे.

एरबस ए३५०

ए३५०चे पहिले उड्डाण

प्रकार लांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे प्रवासी विमान
उत्पादक देश बहुराष्ट्रीय
उत्पादक एरबस
पहिले उड्डाण १४ जून, इ.स. २०१३
समावेश १ जानेवारी, इ.स. २०१५
सद्यस्थिती सेवारत
उपभोक्ते कतार एरवेझ, सिंगापूर एरलाइन्स, कॅथे पॅसिफिक
फिनएर, लुफ्तांसा
उत्पादन काळ इ.स. २०१० -
उत्पादित संख्या ८१ (३० एप्रिल, २०१७
एकूण कार्यक्रमखर्च ११ अब्ज युरो
प्रति एककी किंमत २७ कोटी ५१ लाख युरो (-८००)
३१ कोटी १२ लाख युरो (-९००)
३५ कोटी ९३ लाख युरो (-१०००)

या विमानाचे सुरुवातीस ए३३०ला नवीन इंजिने व सुधारित वायुअवरोधक रचनेसह तयार करण्याचे बेत होते परंतु भावी गिऱ्हाइकांनी याबद्दल नापसंती जाहीर केल्यावर २००६ मध्ये पूर्ण विमानाची पुनर्रचना करण्यात आली व त्यास ए३५० एक्सडब्ल्यूबी (एक्सट्रा वाइड बॉडी) असे नाव देण्यात आले. या विमानाच्या रचनेवर ११ अब्ज युरो खर्च आला. मे २०१७ च्या सुमारास ४७ गिऱ्हाइकांनी ८५१ नगांची मागणी नोंदवलेली होती. या विमानाचे पहिले उड्डाण १४ जून, २०१३ रोजी झाले तर पहिले प्रवासी उड्डाण १५ जानेवारी, २०१५ रोजी झाले.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: