इस्माइली शिया (Isma'ilism) हा शिया इस्लाम या पंथातला एक समुदाय वा उपपंथ आहे. या समुदायानुसार इमामांची संख्या सातच आहे. शेवटचे इमाम मोहम्मद बिन इस्माईल आहेत. यामुळेच समुदायाचे नाव इस्माइली असे आहे. इमाम जाफर सादिक यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा इस्माईल बिन जाफर प्रमुख होणार की त्यांचा धाकटा मुलगा प्रमुख होणार. यावरून त्यांचे इस्ना अशरी समुदायाशी वाद झाले. इस्ना अशरी समुदायाने धाकटा मुलगा मूसा काजिम यांना इमाम मानले. तेव्हापासून दोन गट निर्माण झाले. इस्माइली समुदायाने इस्माईल बिन जाफर यांना सातवे इमाम मानले. या समुदायाचे आचारविचार इस्ना अशरी समुदायापासून वेगळे आहेत.

हे सुद्धा पहा संपादन