इलाम (फारसी: استان ایلام‎, ओस्तान-ए-इलाम, कुर्दी: इलाम) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पश्चिम भागात इराकच्या सीमेवर वसला आहे. पश्चिमेस ४२५ कि.मी. लांबीची इराकी सीमा असलेल्या या प्रांताच्या दक्षिणेस खुजस्तान, पूर्वेस लोरेस्तान, उत्तरेस कर्मानशाह हे इराणाचे प्रांत आहेत. इलाम शहर या प्रांताचे राजधानीचे शहर आहे. इलाम प्रांताची लोकसंख्या सुमारे ५,४०,००० आहे (इ.स. २००५ सालातील अंदाजानुसार).

इलाम
استان ایلام
इराणचा प्रांत

इलामचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
इलामचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी इलाम
क्षेत्रफळ २०,१३३ चौ. किमी (७,७७३ चौ. मैल)
लोकसंख्या ५,४५,७८७
घनता २७ /चौ. किमी (७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-16
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०

इराण–इराक युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला हा प्रांत सध्या इराणमधील सर्वात मागासलेल्या प्रांतांपैकी एक आहे.

बाह्य दुवे संपादन