आयसीडी-१० ही व्याधी व संबंधित आरोग्य समस्यांच्या आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय वर्गीकरणाची, जागतिक आरोग्य संघटनेच्या वैद्यकीय वर्गीकरणाची दहावी आवृत्ती आहे. व्याधी, लक्षणे व चिन्हे, विकृत बाबी, तक्रारी, सामाजिक परिस्थिती आणि व्याधी वा इजांची बाह्य कारणे या सर्वांसाठी या वर्गीकरणात संकेत आहेत. संकेत संच १४,४००हून अधिक विविध संकेत सामावून घेतो आणि अनेक नवीन निदानांवर लक्ष ठेवण्याची परवानगी देतो. पर्यायी उपवर्गीकरणे वापरून हे संकेत १६,०००हून अधिक होतात. वेगवेगळ्या माहिती क्षेत्रांत भरणे अपेक्षित असलेले संकेत वापरून व सुलभ बहुअक्षीय वृत्तीने आयसीडीचा तपशिलाचा स्तर वाढविता येतो.

जागतिक आरोग्य संघटनेने प्रशिक्षणासहित संपूर्ण वर्गीकरण महाजालावर उपलब्ध करून दिलेले आहे. आयसीडी-१० चे काम इ.स. १९८३ मध्ये सुरू झाले आणि १९९२ मध्ये संपले.

यादी संपादन

या विभागात आयसीडी-१० संकेतांची यादी दिलेली आहे.[१]

व्याधींचे व संबंधित आरोग्य समस्यांचे आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्रीय वर्गीकरण दहावी आवृत्ती
प्रकरण संच शीर्षक
A00-B99 विशिष्ट संक्रामक व परजीविक आजार
C00-D48 नववृद्धी
D50-D89 रक्ताचे व रक्त-निर्मात्या अवयवांचे आजार आणि प्रतिरक्षा तंत्राचे विशिष्ट आजार
E00-E90 अंतःस्रावी, पोषणीय व चयापचयी आजार
F00-F99 मानसिक व वर्तनविषयक आजार
G00-G99 तंत्रिका संस्थेचे आजार
H00-H59 कानाचे व कर्णमूल प्रवर्धाचे आजार
H60-695 डोळ्याचे व संलग्न रचनांचे आजार
I00-I99 अभिसरण संस्थेचे आजार
१० J00-J99 श्वसनसंस्थेचे आजार
११ K00-K93 पचनसंस्थेचे आजार
१२ L00-L99 त्वचेचे आणि अधस्त्वचीय ऊतींचे आजार
१३ M00-M99 स्नायूकंकाली संस्था आणि संयोजी ऊतींचे आजार
१४ N00-N99 जननमूत्रीय संस्थेचे आजार
१५ O00-O99 गरोदरपणा, अपत्यजन्म आणि प्रसवोत्तर काल
१६ P00-P96 जन्मपरिकालीन अवधीत उद्भवणाऱ्या विशिष्ट अवस्था
१७ Q00-Q99 जन्मजात कुरचना, विरुपण आणि गुणसूत्रीय व्यंगे
१८ R00-R99 इतरत्र वर्गीकृत न केलेली लक्षणे, चिन्हे आणि अपसामान्य चिकित्सशास्त्रीय व प्रयोगशालीन शोधने
१९ S00-T98 इजा, विषबाधा व बाह्य कारणांचे इतर विशिष्ट परिणाम
२० V01-Y98 अनारोग्यता व मर्त्यता यांची बाह्य कारणे
२१ Z00-Z99 आरोग्यस्थितीवर प्रभाव टाकणारे घटक आणि आरोग्यसेवांशी संपर्क
२२ U00-U99 खास उद्दिष्टांसाठी संकेत

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन