अर्नेस्ट टिल्डेस्ली

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

अर्नेस्ट टिल्डेस्ली तथा जॉर्ज अर्नेस्ट टिल्डेस्ली ( वॉर्सली लॅंकेशायर, ५ फेब्रुवारी १८८९; - ५ मे १९६२) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू होता. तो जॉनी टिल्डेस्ली या क्रिकेट खेळाडूचा धाकटा भाऊ होता. तो लॅंकेशायर क्रिकेट क्लबचा आघाडीचा फलंदाज होता. लॅंकेशायरचा सर्वकाळ अत्युच्च धावा गोळा करणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव अद्यापही अबाधित आहे. सन १९२८-२९ दरम्यान ॲशेस दौऱ्यावर तो फक्त एकदाच गेला. होम ॲशेसमध्ये मात्र चार वेळा खेळला. त्याने सन १९२१ मध्ये शेवटच्या दोन सामन्यांत फार छान कामगिरी केली. ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये त्याने ७६ धावा काढल्या.

कंट्री क्रिकेटमध्ये त्याचे पदार्पण सन १९०९मध्ये तितके जलद नव्हते. मात्र त्यानंतरची तीन वर्षे तो लॅंकेशायरमार्फतच खेळला. त्याने ससेक्सविरुद्ध आपले प्रथम शतक झळकवले. सन १९१३मध्ये संघात त्याचे स्थान नक्की झाले. त्या मोसमात तसेच १९१४मध्ये त्याने १००० धावा काढल्या. पहिल्या जागतिक महायुद्धामुळे त्याचे क्रिकेट संपले.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.