भारतातील नवी दिल्लीच्या बहादूर शाह झाफर मार्ग येथे अरुण जेटली क्रिकेट मैदान (पुर्वीचे फिरोजशहा कोटला मैदान) वसलेले आहे.[२] मैदानाची स्थापन १८८३ मध्ये झाली कोलकाता येथील इडन गार्डन्स नंतर, सध्या चालू स्थितीतील ते भारतातील दुसरे मैदान आहे. २०१६ पर्यंत, शेवटची कसोटी सामन्यांमध्ये २८ वर्षे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १० वर्षे या मैदानावर भारतीय क्रिकेट संघ अजिंक्य राहिला आहे.[३] अनिल कुंबळेचे पाकिस्तानविरुद्ध एका कसोटी डावातील १० बळी, सुनील गावसकरला मागे टाकून ३५ शतकांसह सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम आणि त्या आधी डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी गावसकरने केलेली बरोबरी अशा उल्लेखनीय घटनांमुळे हे मैदान लक्षात राहते.

फिरोजशाह कोटला मैदान
मैदान माहिती
स्थान बहादूर शहा झाफर मार्ग, दिल्ली
गुणक 28°38′16″N 77°14′35″E / 28.63778°N 77.24306°E / 28.63778; 77.24306गुणक: 28°38′16″N 77°14′35″E / 28.63778°N 77.24306°E / 28.63778; 77.24306
स्थापना १८८३[१]
आसनक्षमता ४८,०००[२]
मालक दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन
प्रचालक दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन
यजमान भारतीय क्रिकेट संघ
दिल्ली क्रिकेट संघ
दिल्ली डेरडेव्हिल्स

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १०-१४ नोव्हेंबर १९४८:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा. ३-७ डिसेंबर २०१५:
भारत  वि. दक्षिण आफ्रिका
प्रथम ए.सा. १५ सप्टेंबर १९८२:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. २० ऑक्टोबर २०१६:
भारत वि. न्यू झीलंड
प्रथम २०-२० २३ मार्च २०१६:
अफगाणिस्तान वि. इंग्लंड
अंतिम २०-२० ३० मार्च २०१६:
इंग्लंड वि. न्यू झीलंड
शेवटचा बदल १ जानेवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

इतिहास संपादन

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान १० नोव्हेंबर १९४८ रोजी झालेला कसोटी सामना, हा ह्या मैदानावरचा पहिला कसोटी सामना होता. मैदानाचे मालकी आणि व्यवस्थापकिय हक्क डीडीसीए (दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन) कडे आहेत. १९५२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना हेमू अधिकारी आणि गुलाम अहमद यांनी दहाव्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारीचा ह्या मैदानातील विक्रम आजपर्यंत अबाधित आहे. १९६५ मध्ये, श्रीनिवास वेंकटराघवनने त्याच्या पदार्पणातील मालिकेमध्ये न्यू झीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडताना ७२ धावांत ८ आणि ८० धावांत ४ गडी बाद केले होते. १९६९-७० मध्ये, बिशनसिंग बेदी आणि एरापल्ली प्रसन्ना ह्या फिरकी जोडीने १८ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला ७ गड्यांनी सुप्रसिद्ध विजय विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.[४] १९८१ मध्ये, जेफ्री बॉयकॉटने गॅरी सोबर्सचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला. १९८-८४ मध्ये सुनील गावसकरने त्याचे २९वे शतक ठोकून डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक काळासाठी अबाधित असलेला सर्वात जास्त कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. १९९९-२००० मध्ये, पाकिस्तान विरुद्ध कसोटीच्या चवथ्या डावात ७४ धावांत १० बळी घेऊन एका डावात १० बळी घेणारा अनिल कुंबळे हा जिम लेकर नंतर दुसरा गोलंदाज ठरला. २००५-०६ मध्ये ह्याच मैदानावर सचिन तेंडुलकरने गावस्करचा सर्वाधिक ३५ कसोटी शतकांचा विक्रम मोडला.[४] २७ डिसेंबर २००९ रोजी, सामना खेळवण्यास खेळपट्टी योग्य नसल्या कारणाने भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना रद्द करण्यात आला. सामनाधिकाऱ्याच्या सामना अहवालावरुन, आयसीसीने मैदानावर १२ महिन्यांचा निर्बंध लादला. त्यानंतर थेट २०११ क्रिकेट विश्वचषकासाठी मैदानाची निवड करण्यात आली.[५] २००८ पासुन सदर मैदान हे भारतीय प्रीमियर लीगचा संघ दिल्ली डेरडेव्हिल्सचे होम ग्राऊंड आहे.[४]

आकडेवारी संपादन

 
फिरोज शाह कोटला – वेस्ट इंडीज वि दक्षिण आफ्रिका
 
फिरोज शाह कोटला मैदान

कसोटी क्रिकेट संपादन

  • सर्वाधिक सांघिक धावसंख्या: वेस्ट इंडीज ६४४/८घो वि भारत, ६ फेब्रुवारी १९५९[६]
  • सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या: भारत ७५ वि वेस्ट इंडीज, २५ नोव्हेंबर १९८७[७]
  • सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकर (७५९ धावा)
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: बर्ट सुटक्लिफ २३०* वि भारत, १६ डिसेंबर १९५५
  • सर्वात यशस्वी गोलंदाज: अनिल कुंबळे (५८ बळी)

एकदिवसीय क्रिकेट संपादन

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी संपादन

कसोटी संपादन

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१०-१४ नोव्हेंबर १९४८   भारत   वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
२-७ नोव्हेंबर १९५१   भारत   इंग्लंड अनिर्णित धावफलक
१६-१८ ऑक्टोबर १९५२   भारत   पाकिस्तान   भारत १ डाव आणि ७० धावा धावफलक
१६-२१ डिसेंबर १९५५   भारत   न्यूझीलंड अनिर्णित धावफलक
६-११ फेब्रुवारी १९५९   भारत   वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
१२-१६ डिसेंबर १९५९   भारत   ऑस्ट्रेलिया   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १२७ धावा धावफलक
८-१३ फेब्रुवारी १९६१   भारत   पाकिस्तान अनिर्णित धावफलक
१३-१८ डिसेंबर १९६१   भारत   इंग्लंड अनिर्णित धावफलक
८-१३ फेब्रुवारी १९६४   भारत   इंग्लंड अनिर्णित धावफलक
१९-२२ मार्च १९६५   भारत   न्यूझीलंड   भारत ७ गडी धावफलक
२८ नोव्हेंबर-२ डिसेंबर १९६९   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ७ गडी धावफलक
२०-२५ डिसेंबर १९७२   भारत   इंग्लंड   इंग्लंड ६ गडी धावफलक
११-१५ डिसेंबर १९७४   भारत   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज १ डाव आणि १७ धावा धावफलक
१७-२२ डिसेंबर १९७६   भारत   इंग्लंड   इंग्लंड १ डाव आणि २५ धावा धावफलक
२४-२९ जानेवारी १९७९   भारत   वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
१३-१८ ऑक्टोबर १९७९   भारत   ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
४-९ डिसेंबर १९७९   भारत   पाकिस्तान अनिर्णित धावफलक
२३-२८ डिसेंबर १९८१   भारत   इंग्लंड अनिर्णित धावफलक
२९ ऑक्टोबर -३ नोव्हेंबर १९८३   भारत   वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
१२-१७ डिसेंबर १९८४   भारत   इंग्लंड   इंग्लंड ८ गडी धावफलक
२६-३० सप्टेंबर १९८६   भारत   ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
२५-२९ नोव्हेंबर १९८७   भारत   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज ५ गडी धावफलक
१३-१७ मार्च १९९३   भारत   झिम्बाब्वे   भारत १ डाव आणि १३ धावा धावफलक
१०-१३ ऑक्टोबर १९९६   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ७ गडी धावफलक
४-७ फेब्रुवारी १९९९   भारत   पाकिस्तान   भारत २१२ धावा धावफलक
१८-२२ नोव्हेंबर २०००   भारत   झिम्बाब्वे   भारत ७ गडी धावफलक
२८ फेब्रुवारी-४ मार्च २००२   भारत   झिम्बाब्वे   भारत ४ गडी धावफलक
१०-१४ डिसेंबर २००५   भारत   श्रीलंका   भारत १८८ धावा धावफलक
२२-२६ नोव्हेंबर २००७   भारत   पाकिस्तान   भारत ६ गडी धावफलक
२९ ऑक्टोबर-२ नोव्हेंबर २००८   भारत   ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
६-९ नोव्हेंबर २०११   भारत   वेस्ट इंडीज   भारत ५ गडी धावफलक
२२-२४ मार्च २०१३   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ६ गडी धावफलक
३-७ डिसेंबर २०१५   भारत   दक्षिण आफ्रिका   भारत ३३७ धावा धावफलक

एकदिवसीय संपादन

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१५ सप्टेंबर १९८२   भारत   श्रीलंका   भारत ६ गडी धावफलक
०२ ऑक्टोबर १९८६   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ३ गडी धावफलक
१३ जानेवारी १९८७   भारत   श्रीलंका   भारत ६ गडी धावफलक
२२ ऑक्टोबर १९८७   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ५६ धावा धावफलक
१५ ऑक्टोबर १९८९   इंग्लंड   श्रीलंका   इंग्लंड ५ गडी धावफलक
२३ ऑक्टोबर १९८९   भारत   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज २० धावा धावफलक
०३ नोव्हेंबर १९९४   भारत   न्यूझीलंड   भारत १०७ धावा धावफलक
०२ मार्च १९९६   भारत   श्रीलंका   श्रीलंका ६ गडी धावफलक
११ एप्रिल १९९८   ऑस्ट्रेलिया   झिम्बाब्वे   ऑस्ट्रेलिया १६ धावा धावफलक
१४ एप्रिल १९९८   भारत   ऑस्ट्रेलिया   ऑस्ट्रेलिया ४ गडी धावफलक
१७ नोव्हेंबर १९९९   भारत   न्यूझीलंड   भारत ७ गडी धावफलक
३१ जानेवारी २००२   भारत   इंग्लंड   इंग्लंड २ धावा धावफलक
१७ एप्रिल २००५   भारत   पाकिस्तान   पाकिस्तान १५९ धावा धावफलक
२८ मार्च २००६   भारत   इंग्लंड   भारत ३९ धावा धावफलक
०२ डिसेंबर २००८   भारत   इंग्लंड सामना रद्द धावफलक
३१ ऑक्टोबर २००९   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ६ गडी धावफलक
२७ डिसेंबर २००९   भारत   श्रीलंका अनिर्णित धावफलक
२४ फेब्रुवारी २०११   दक्षिण आफ्रिका   वेस्ट इंडीज   दक्षिण आफ्रिका ७ गडी धावफलक
२८ फेब्रुवारी २०११   नेदरलँड्स   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज २१५ धावा धावफलक
०७ मार्च २०११   कॅनडा   केन्या   कॅनडा ५ गडी धावफलक
०९ मार्च २०११   भारत   नेदरलँड्स   भारत ५ गडी धावफलक
१७ ऑक्टोबर २०११   भारत   इंग्लंड   भारत ८ गडी धावफलक
०६ जानेवारी २०१३   भारत   पाकिस्तान   भारत १० धावा धावफलक
११ ऑक्टोबर २०१४   भारत   वेस्ट इंडीज   भारत ४८ धावा धावफलक
२० ऑक्टोबर २०१६   भारत   न्यूझीलंड   न्यूझीलंड ६ धावा धावफलक

टी२० संपादन

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[११]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२३ मार्च २०१६ Afghanistan   इंग्लंड   इंग्लंड १५ धावा धावफलक
२६ मार्च २०१६   इंग्लंड   श्रीलंका   इंग्लंड १० धावा धावफलक
२८ मार्च २०१६   दक्षिण आफ्रिका   श्रीलंका   दक्षिण आफ्रिका ८ गडी धावफलक
३० मार्च २०१६   इंग्लंड   न्यूझीलंड   इंग्लंड ७ गडी धावफलक

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-09-21. 2017-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ a b "फिरोजशाह कोटला, नवी दिल्ली". क्रिकविन्डो (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / कसोटी सामने". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ a b c फिरोजशाह कोटला क्रिकइन्फो.कॉम
  5. ^ २०१० च्या शेवटीपर्यंतर फिरोजशाह कोटलावर आंतरराष्ट्रीय सामने नाहीत
  6. ^ "वेस्ट इंडीजचा भारत दौरा, ५वी कसोटी: भारत वि वेस्ट इंडीज, दिल्ली, फेब्रुवारी ६-११, १९५९" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "वेस्ट इंडीजचा भारत दौरा, १ली कसोटी: भारत वि वेस्ट इंडीज, दिल्ली, २५-२९ नोव्हेंबर, १९८७" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ a b "आयसीसी क्रिकेट विश्वचषक, १३वा सामना, गट ब: नेदरलँड्स वि वेस्ट इंडीज, दिल्ली, २८ फेब्रुवारी २०११" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन