अभिषेक बच्चन

भारतीय अभिनेता

अभिषेक बच्चन ( ५ फेब्रुवारी १९७६) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनजया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक अयशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ३ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अभिषेक बच्चन
जन्म ५ फेब्रुवारी, १९७६ (1976-02-05) (वय: ४८)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, निर्माता
कारकीर्दीचा काळ २००० - चालू
भाषा हिंदी
वडील अमिताभ बच्चन
आई जया अमिताभ बच्चन
पत्नी
अपत्ये आराध्या बच्चन

माजी मिस वर्ल्ड विजेती व बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनची पत्नी आहे. त्यांच्या जोडीला सिने-जगतात अभिवर्या ह्या टोपणनावाने ओळखले जाते.

चित्रपट कारकीर्द संपादन

वर्ष शीर्षक भूमिका
२००० रेफ्युजी रेफ्युजी
२००० ढाई अक्षर प्रेम के करन खन्ना
२००० तेरा जादू चल गया कबीर श्रीवास्तव
२००१ बस इतना सा ख्वाब है सूरज श्रीवास्तव
२००२ हां मैने भी प्यार किया शिव कपूर
२००२ शरारत राहुल खन्ना
२००२ ओम जय जगदीश जगदीश बत्रा
२००३ मुंबई से आया मेरा दोस्त अजान
२००३ मैं प्रेम की दिवानी हूं प्रेमकुमार
२००३ कुछना कहो राज
२००३ जमीन एसीपी जय
२००३ एल.ओ.सी. कारगिल लेफ्टनंट विक्रम बात्रा
२००४ रन सिद्धार्थ (सिद्धू)
२००४ युवा लल्लन सिंघ
२००४ धूम एसीपी जय दीक्षित
२००४ फिर मिलेंगे तरुण आनंद
२००४ नाच अभिनव
२००५ बंटी और बबली राकेश त्रिवेदी / बंटी
२००५ सरकार शंकर नागरे
२००५ दस शशांक धीर
२००५ ब्लफमास्टर रॉय कपूर
२००६ कभी अलविदाना कहना ऋषी तलवार
२००६ उमराव जान नवाब सुलतान
२००६ धूम २ एसीपी जय दीक्षित
२००७ गुरू गुरूकांत देसाई
२००७ झूम बराबर झूम रिकी ठुकराल
२००७ सरकार राज शंकर नागरे
२००८ द्रोणा आदित्य / द्रोणा
२००८ दोस्ताना समीर
२००९ दिल्ली ६ रोशन मेहरा
२००९ पा अमोल अत्रे
२०१० रावण बीरा मुंडा
२०१० खेलें हम जी जान से सुराज्य सेन 
२०११ गेम नील मेनन
२०११ दम मारो दम एसीपी विष्णू कामथ
२०१२ प्लेयर्स चार्ली
२०१२ बोल बच्चन अब्बास अली
२०१३ धूम ३ एसीपी जय दीक्षित
२०१४ हॅपी न्यू इयर नंदू भिडे / विकी ग्रोव्हर
२०१५ ऑल इज वेल इंदर भल्ला
२०१६ हाउसफुल्ल ३ बंटी

चित्रदालन संपादन

बाह्य दुवे संपादन

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अभिषेक बच्चन चे पान (इंग्लिश मजकूर)