अफू हा अफूच्या बोंडामधून काढलेला चीक वाळवून बनवलेला एक पदार्थ आहे. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी व कमी अंशी खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच अफू वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरला जातो.

अफूच्या पिकाचा एक बोंड व त्यामधून बाहेर येणारा चीक

हेरॉईनची तस्करी हा जगातील एक प्रमुख गुन्हा आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफूची शेती करणारा देश असून जगातील एकूण अफूच्या ७० टक्के उत्पादन येथेच होते.