अझीम हाशिम प्रेमजी (जन्म २४ जुलै १९४५) हे भारतीय व्यापारी, गुंतवणूकदार, अभियंता आणि परोपकारी आहेत, ते विप्रो लिमिटेडचे ​​अध्यक्ष होते. प्रेमजी बोर्डाचे गैर-कार्यकारी सदस्य आणि संस्थापक अध्यक्ष आहेत. ते अनौपचारिकपणे भारतीय आयटी उद्योगाचे झार म्हणून ओळखले जातात. सॉफ्टवेर उद्योगातील जागतिक नेत्यांपैकी एक म्हणून उदयास येण्यासाठी चार दशकांच्या विविधीकरण आणि वाढीद्वारे विप्रोला मार्गदर्शन करण्यासाठी ते जबाबदार होते. २०१० मध्ये, ते एशियावीक द्वारे जगातील २० सर्वात शक्तिशाली पुरुषांमध्ये निवडले गेले. टाइम नियतकालिकाने १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांची दोनदा यादी केली आहे, एकदा २००४ मध्ये आणि अगदी अलीकडे २०११ मध्ये. अनेक वर्षांपासून, ते नियमितपणे ५०० सर्वात प्रभावशाली मुस्लिमांच्या यादीत आहे. ते अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळुरूचे कुलपती म्हणूनही काम करतात.

अझीम प्रेमजी

अझीम प्रेमजी यांचा मुंबई मधील भारतीय मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म झाला. त्यांचे वडील हे एक नावाजलेले  उद्योगपती होते व राईस किंग ऑफ बर्मा म्हणून ओळखले जात. पाकिस्तानचे संस्थापक मुहंमद आली जिन्हा यांनी अझीम प्रेमजी यांचे वडील मुहंमद हाशिम प्रेमजी यांना पाकिस्तानमध्ये आमंत्रित केले होते, परंतु त्यांनी ती विनंती फेटाळली व भारतातच राहणे पसंत केले. अझीम प्रेमजी यांनी स्टॅनफर्ड विध्यापिठामधून इलेकट्रीकल इंजिनीयरींग या विषयामधून पदवी घेतली आहे. त्यांनी यास्मिन यांच्याशी विवाह केला. अझीम प्रेमजी याना रिषद आणि तारिक ही दोन मुले आहेत. रिषद हे सध्या विप्रो कंपनीच्या आयटी विभागात चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत. ऑक्टोबर २०१९ च्या यादी नुसार ते भारतातील दहा अतिश्रीमंत  लोकांमध्ये येतात. २०१३ मध्ये त्यांनी द गिविंग प्लेज साइन करून त्याची अर्धी संपत्ती दान करण्याचे ठरवले आहे. अझीम प्रेमजी यांनी 'अझीम प्रेमजी फौंडेशन, स्थापना केली आहे जी भारतातील शिक्षण क्षेत्रासाठी काम करते.

महाराष्ट्र तील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी मुहंमद हाशिम प्रेमजी यांनी १९४५ साली वेस्टर्न इंडियन वेजिटेबल प्रोडक्ट्स लि . सुरू केली. या कंपनी मध्ये सनफ्लॉवर वनस्पती या नावाखाली कुकिंग ऑइलचे उत्पादन घेतले जात, त्याचबरोबर ७८७ नावाने लौंड्री सोपची ही निर्मिती केली जात असे.  १९६६ साली वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अझीम प्रेमजी स्टॅनफर्ड विध्यापिठामधून भारतात परतले व त्यांनी विप्रो कंपनीचा चार्ज घेतला, यावेळी ते २१ वर्षांचे होते. त्या काळी वेस्टर्न इंडियन वेजिटेबल प्रोडक्ट्स लि या नावाने ओळखली जाणारी कंपनी हैड्रोजनीत वनस्पती तेलाची निर्मिती करत होती , परंतु अझीम प्रेमजी यांनी बेकरी फॅट्स, हेअर केर सोप्स, बेबी टोयलीटरीज, लायटिंग प्रोडक्ट्स,ची उत्पादने घेण्यास सुरुवात केली. १९८० च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाची महत्त्व ओळखून या तरुण उद्योगपतीने उच्च तंत्रज्ञानाच्या निर्मितीस सुरुवात केली. सेंटीने या अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने त्यांनी मिनी कम्प्युटर्सचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांनी आपल्या कंपनीचे 'विप्रो' असे नामकरण केले. त्यांनी आपले सगळे लक्ष माहिती तंत्रज्ञाना कडे वळवले.

२००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एडुकेशन ने २००० साली मानद विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले. २००६ साली नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीयरिंग, मुंबई यांनी अझीम प्रेमजी यांना लक्ष्य बिझनेस व्हिजनरी या पुरस्काराने सन्मानित केले.बिझनेस वीक मॅगझीन ने विप्रो कंपनी ही जगातील सर्वात वेगवान प्रगती करणारी कंपनी  व अझीम प्रेमजी यांची महान उद्योगपती म्हणून दाखल घेतली.  २००९  साली मिडलटाऊन येथील  वेसलेयन विद्यापीठ ने त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन  मानद विद्यावाचस्पती पदवीने सन्मानित केले.  २०१५ साली म्हैसूर विज्ञापीठाने मानद विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले. एप्रिल २०१७ साली इंडिया टुडे मॅगझिनने २०१७ सालच्या यादीमध्ये भारतातील ५० प्रभावशाली लोकांमध्ये अझीम प्रेमजी यांना  ९ वा क्रमांक दिला.

सामाजिक कार्य-

अझीम प्रेमजी फौंडेशन -

२००१ साली अझीम प्रेमजी फौंडेशन या संस्थेची स्थापना केली. डिसेंबर २०१० साली भारतातील शालेय शिक्षणा साठी २ अब्ज यू एस डॉलर दान करण्याची प्रतिज्ञा केली.

अझीम प्रेमाजीनी स्थापन केलेल्या कंपन्यांची सूची संपादन

  • विप्रो लायटिंग व विप्रो जीई मेडिकल सिस्टिम्स, १९९१
  • विप्रो नेट, १९९९
  • नेटक्रेकर, २०००
  • विप्रो वॉटर, २००८
  • विप्रो इकोएनर्जी, २००९