अग्नि-५ क्षेपणास्त्र

अग्नि-५ क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून त्याचा वेग २४ मॅक असा नोंदवला गेला.

अग्नि-५ क्षेपणास्त्र

अग्नि-५ क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान
प्रकार आंतरखंडिय क्षेपणास्त्र
राष्ट्र भारत
सेवेचा इतिहास
सेवेत २०१७
वापरकर्ते सामरिक बल कमांड
उत्पादनाचा इतिहास
उत्पादक संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), Bharat Dynamics Limited (BDL)
तपशील
वजन ५०००० किलो
लांबी १७.५ मीटर
व्यास २ मीटर

युद्धाग्र १५०० किलो अण्वस्त्र

इंजिन तीन टप्प्याचे घन इंधन
क्रियात्मक
पल्ला
५००० किलोमीटर
उड्डाणाची उंची > 90 km
गती २४ मॅक
दिशादर्शक
प्रणाली
रिंग लेसर गायरोस्कोप, इनर्शियल नॅन्हिगेशन प्रणाली व पर्यायी जी.पी.एस.,
क्षेपण
मंच
8 x 8 Tatra TELAR (Transporter erector launcher) Rail Mobile Launcher

विकास संपादन

या क्षेपणास्त्राचा विकास संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून २००७ पासून केला जात होता. २०१४ साली हे अस्त्र सेनादलात सामील होईल असे अपेक्षित आहे.

वर्णन संपादन

अग्नि-५ हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद असून त्याचे वजन ५० टन एवढे आहे. अवघ्या २० मिनिटांत आपले लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्रात एक टन अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यात रिंग लेसर गायरोस्कोप, इनर्शियल नेव्हिगेशन प्रणाली व पर्यायी जी.पी.एस.चा वापर करण्यात आल्याने हे क्षेपणास्त्र नेमक्या दिशेने मार्गक्रमणा करू शकेल. क्षेपणास्त्र एका वेळी तीन लक्षांचा वेध घेऊ शकते.

चाचणी संपादन

आतापर्यंत ह्या क्षेपणास्त्राच्या पाच चाचण्या घेण्यात आल्या.
पहिली चाचणी : १९ एप्रिल २०१२[१]
दुसरी चाचणी : १५ सप्टेंबर २०१३[२]
तिसरी चाचणी : ३१ जानेवारी २०१५[३]
चवथी चाचणी : २६ डिसेंबर २०१६[४]
पाचवी चाचणी : १८ जानेवारी २०१८[५][६]

संदर्भ संपादन