अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ - २५० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, अक्कलकोट मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका आणि सोलापूर दक्षिण तालुक्यातील बोरामणी, मुस्ती, वलसंग ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. अक्कलकोट हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे सचिन पंचप्पा कल्याण-शेट्टी हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सचिन पंचप्पा कल्याण-शेट्टी भारतीय जनता पक्ष
२०१४ सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ सिद्रामप्पा मलकाप्पा पाटील भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन