अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ - १४० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, अंबरनाथ मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील १. अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ (ग्रामीण) महसूल मंडळ आणि अंबरनाथ नगरपालिका, २. उल्हासनगर तालुक्यातील, उल्हासनगर महानगरपालिकेच्या (भाग) वॉर्ड क्र. १४ ते २२ आणि ४४ ते ५१ यांचा समावेश होतो. अंबरनाथ हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

शिवसेनेचे बालाजी प्रल्हाद किणीकर हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

अंबरनाथ मतदारसंघातून निवडून आलेले आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ बालाजी प्रल्हाद किणीकर शिवसेना
२०१४ बालाजी प्रल्हाद किणीकर शिवसेना
२००९ बालाजी प्रल्हाद किणीकर शिवसेना

निवडणूक निकाल संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन