रामायणानुसार अंगद (संस्कृत: अंगद; मलय: Seri Anggada, सरी अंगदा / स्री अंगदा; भासा इंडोनेशिया: Hangada, हांगदा; थाई: องคต , ओंकोत; तमिळ: அங்கதன் ; अंकतन्) हा एक वानरयोद्धा व वानरांच्या किष्किंधा नामक राज्याचा युवराज होता. हा वानरराज वाली व त्याची पत्नी तारा यांचा पुत्र, तर वानरराज सुग्रीव याचा पुतण्या होता. सीताशोधार्ध हिंडणाऱ्या रामाला याने शोधकार्यात, तसेच सीतेस हरून नेणाऱ्यारावणाशी लढण्याच्या कामी मदत केली.

रावणाशी शिष्टाई करतानाचे अंगदाचे मुद्रित कल्पनाचित्र (निर्मिती: राजा रविवर्मा चित्रशाळा; निर्मितिकाळ: इ.स. १९१० चे दशक)

सुग्रीवाच्या मृत्युपश्चात हा किष्किंधेचा राजा झाला[१].

संदर्भ संपादन

  1. ^ सिद्धेश्वरशास्त्री चित्राव. भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (खंड १). p. २०.
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत