"मल्हारराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: प्रथम-द्वितीय पुरुष--लेखन तृतीयपुरूषात बदला
ओळ १३:
उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती, [[राणोजी शिंदे]] आणि [[उदाजी पवार]] यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा होता, मल्हार आया.. मल्हार आया... गर्जनेने शत्रूची दाणादाण उडत असे. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या [[माणकोजी शिंदे]] यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. खंडेराव विलासी वृत्तीचा असल्याने मल्हारबांनी अहिल्येवर पुत्रवत प्रेम केले आणि तिच्यावर जबाबदारी सोपविली. १७ मार्च १७५४ मध्ये अघटित घटना घडली, कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडला आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून मृत्यूमुखी पडला. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी अकराजणी सती गेल्या.
 
पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. याच सुमारास जेजुरीगडावरील नगारखान्याचे बांधकाम पूर्ण झाले. रांगडे आणि कठोर व्यक्तिमत्त्व असलेले मल्हारराव, कधी कधी इतके मवाळ होत की शरण आलेल्या शत्रूला आपल्या बरोबरीने वागवत. मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळा सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात झाला. आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मल्हारराव आणि त्यांचे साथीदार कसेबसे जीव वाचवून बाहेर पडले.
 
पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.