"चे गेव्हारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''[[अर्नेस्टो "चे" गेवारा''']] ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Ernesto Che Guevara''), ऊर्फ '''चे गेवारा''' किंवा '''एल चे''' किंवा '''चे''', ([[जून १४]], [[इ.स. १९२८]] - [[ऑक्टोबर ९]], [[इ.स. १९६७]]) हा [[आर्जेन्टिना|आर्जेंटिना]]चा मार्क्सवादी क्रांतिकारक, वैद्य, लेखक, गनिमी लढवय्यांचा म्होरक्या, राजकीय नेता आणि लष्कर तज्ञ होता. तो क्युबन क्रांतीमधील एक प्रमुख व्यक्ती होता.
 
वैद्यकीय शिक्षण घेत असताना चेने लॅटिन अमेरिकेचे भ्रमण केले. त्यादरम्यान त्याला गरीबी व एलियनेशनचे विदारक दृष्य आढळले, ज्यामुळे त्याचे मतपरिवर्तन झाले. त्याचे अनुभव व निरिक्षणांद्वारे तो ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचला की “लॅटिन अमेरिकन प्रदेशात रुजलेली आर्थिक विषमता ही भांडवलशाही, एकाधिकारशाही, नव-उपनिवेशवाद व साम्राज्यवाद ह्या आंतरिक घटकांचा परिणाम आहे, ज्यावर एकमात्र उपाय म्हणजे जागतिक क्रांती आहे.” ह्या विचारांनी त्याला ग्वातेमालाच्या सामाजिक पुनर्रचनेमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले. हे पुनर्रचनेचे कार्य तद्कालीन राष्ट्राध्यक्ष जॅकोबो अर्बेन्झ ह्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते.