Content deleted Content added
ओळ ४०:
 
धन्यवाद -[[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]])
 
 
== पुन्हा एकदा दर्जा!!!!! ==
 
नमस्कार मंडळी!
 
गेल्या दोनेक दिवसांत बरेच नवीन आणि कोरे (एकही वाक्य नाही !) लेख बनवल्याचे दिसते. मराठी विकिपीडियावर आधीच वाचनीय आशयाच्या नावाने बोंब आहे, त्यात अश्या कोर्याख लेखांची भर घालण्याचे प्रयोजन कळले नाही. नवे लेख बनवताना त्यात कृपया दोन-तीन वाचनीय, माहितीपूर्ण वाक्ये लिहावीत. नाहीतर आपण लिहीत असलेल्या माहितीचे, करत असलेल्या श्रमाची किंमत शून्य ठरते, हे ध्यानात घ्यावे.
 
मराठी विकिपीडियाची लेखसंख्येबाबत कुणाशी स्पर्धा आहे काय ? असल्यास, असली स्पर्धा करण्यात काहीही हशील नाही, कारण पन्नास-साठ भाषांतले विकिपीडिया दर्जा आणि संख्या या दोन्ही पौलूंत मराठीच्या पुढे आहेत. सगळ्यांना गाठत ऊर धपापून घेण्यापेक्षा, मराठी विकिपीडियाने अगोदर स्वतःशी स्पर्धा करत स्वतःचा दर्जा अधिकाधिक उंचावावा, "मराठी भाषकांच्या कामी पडणारा, समृद्ध आणि आशयघन ज्ञानकोश' असा लौकीक कमवावा. अन्यथा मराठी विकिपीडिया 'फुसक्या लेखांचा ढिगारा' म्हणून कुख्यात होईल, यात शंका नाही. :)
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १२:०८, ३ मे २०११ (UTC)