"रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{वर्ग}}
छो Robot: Automated text replacement (-स्वत: +स्वतः)
ओळ ५:
रामदासस्वामींची वाङ्‌मय संपदा अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरत्या त्यांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या वाङमयाचे मूल्यमापन भिन्न प्रकारे, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारवंतांनी केले आहे. त्यांच्या एक एक वाङ्‌मय प्रकाराचा ऊहापोह करून त्या प्रकारच्या वाङ्‌मयातून समर्थ काय सांगतात, हे पहातानाही त्यांच्या भक्तीचे, शैलीचे, बुद्धिमत्तेचे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषावैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही.
 
रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्यांमध्ये विविधता आहे. आरती म्हणजे पूजेनंतर देवाला वातीचा दिवा लावून ओवाळणे आणि तो ओवाळताना म्हणायचे गीत. आरती म्हणजे आर्तता, व्याकुळता, वेदना, तळमळ, दु:ख व्यक्त करणे, आत्मनिवेदन करणे, वगैरे. आरतीत ईश्वराची मनोभावे प्रार्थना व ईश्वराला भवबंधनातून सोडविण्यासाठी याचना असते. जिवाशिवाचे ऐक्य साधणे, देवाची स्तुती करणे, त्यांच्या रुपा-गुणाचे गान करणे, त्याचे लीलाचरित्र गाणे, भक्ताने पूर्णपणे शरणागती पत्करणे असा भाव आरतीत असतो. समर्थांनी "रामी रामदास' किंवा "दास रामाचा' असा स्वत:चास्वतःचा उल्लेख असलेल्या एकूण ६१ आरत्या रचल्या आहेत.
 
"रामी रामदास सहजी सहज ओवाळी।