"कुष्ठरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-अॅ +ॲ)
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
ओळ ३:
 
==वर्णन==
हॅन्सन या शात्रज्ञाच्या नावावरून कुष्ठरोग ओळखला जातो. 1878 साली त्याने या रोगाचा कारक “मायकोबॅक्टेरियम लेप्रि” चा शोध लावला. या जिवाणूच्या संसर्गाने त्वचेमध्ये अस्वाभाविक बदल होतात. या बदलास विकृतिस्थल म्हणतात. त्वचेवरील हे भाग वेड्यावाकड्या आकाराचे आणि वैशिष्ठ्यपूर्ण असतात. त्यांची कड गडद रंगाची आणि मध्यभाग फिकट रंगाचा दिसतो. मायकोबॅक्टेरियम लेप्रि कमी तापमानास वाढतो. त्यामुळे त्वचा , अंतत्वचा आणि चेता यामध्ये तो वाढतो. चेतामध्ये वाढल्याने चेता नष्ट होतात आणि त्या भागाची संवेदना नाहिशी होते. हातापायांच्या बोटांची संवेदना नाहिशी झाली म्हणजे त्याना इजा होण्याची शक्यता वाढते. इजा झाल्यास जखमामध्ये जिवाणू वाढतात आणि उघड्या जखमा होतात. उघड्या जखमांचे पर्यावसानपऱ्यावसान गॅंग्रीनमध्ये झाल्याने उती मृत होतात. अशाने अवयव विद्रूप होतात. शरीर विद्रूप झाल्याने दोन हजार वर्षापूर्वी बायबल काळात कुष्ठरोग हा ओंगळवाणा रोग अशी त्याची ख्याती होती. बायबलच्या जुन्या करारात याचा उल्लेख आहे. या काळात कुष्ठरोगाचे रुग्ण समाजापासून वेगळे ठेवले जात. त्यांच्यासाठी वेगळ्या वस्त्या असत. अजून समाजात या रोगाबद्द्ल हीन भावना आहे. हा रोग वेगाने पसरणारा संसर्गजन्य नाही. त्याची वाढ अत्यंत सावकाश होते. घरामधील रुग्णाचा वावर आणि कुष्ठरोग्याची तपासणी करणारा वैद्यकीय कर्मचारी यांच्यापासून तो पसरत नाही. तो पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगावरील उपचार दीर्घ मुदतीचे आणि बहु उपचारी आहेत.
 
==रुग्ण संख्या==
ओळ २८:
सर्वात प्रचलित कुष्ठरोगावरील उपचारामध्ये डॅप्सोन हे औषध दिले जाते. जेंव्हा हे औषध नव्याने वापरात आले त्या वेळी त्याची परिणामकता उत्तम होती. पण काहीं वर्षामध्ये डॅप्सोन प्रतिकार जिवाणू आढळल्यानंतर बहु उपचार पद्धती वापरण्यात येऊ लागली. या उपचार पद्धतीचे लघुरूप एमडीटी (मल्टि ड्र्ग थेरपी) असे आहे. एमडीटी मध्ये डॅप्सोन, रिफांपिन (रिफंमिसिन) आणि क्लोफॅझिमिन (लॅम्प्रीन) या तीन जिवाणूप्रतिबंधक औषधांचा उपयोग करण्यात येतो. एमबी कुष्ठरोगावर तीनही औषधे देण्यात येतात. पीबी कुष्ठरोगावर मात्र फक्त रिफांपिन आणी डॅप्सोनचा वापर करण्यात येतो. तीन महिन्यांच्या उपचारानंतर रुग्णाचा संसर्ग कमी व्हायला लागतो. उपचार चालू करण्याआधी बरेच रुग्ण संसर्गजन्य असत नाहीत. कुष्ठरोगाच्या प्रकारानुसार सहा महिने ते दोन वर्षे कुष्ठरोगावर उपचार घ्यावे लागतात.
कुष्ठरोगाच्या दोन्ही औषधांचा थोडा पार्श्व परिणाम होतो. डप्सोनमुळे मळमळ, गुंगी,हृदयगति वृद्धि, कावीळ आणि अंगावर पुरळ येऊ शकतात. पुरळ आल्यास त्वरिय वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॅप्सोनची रिफांपिन बरोबर आंतरक्रिया होते. रिफाम्पिन डॅपसोनच्या शरीरातील चयापचयाचा वेग वाढवते. त्यामुळे डॅपसोनचा डोस ॲयडजेस्ट करावा लागतो. रिफांपिन मुळे स्नायूदुखी आणि मळमळ सुरू होते. कावीळ किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तिसरे औषध क्लोफॅझिमिन मुळे पोटात तीव्र वेदना आणि अतिसार होतो. कधी कधी त्वचेचा रंग बदलतो. तांबडा ते काळसर बदललेला त्वचेचा रंग पूर्ववत होण्यास औषध बंदा केल्यानंतर बरीच वर्षेलागतात. थॅलिडोमाइड नावाचे जन्मजात दोष उत्पन्न होण्याबद्दलचे कुप्रसिद्ध औषध सध्या कुष्ठरोगाची गुंतागुंत कमी करते. थॅलिडोमाइड शरीरातील ट्यूमर विघटन यंत्रणा नियंत्रित करते.
कुष्ठरोगाच्या रुग्णाना उपचार चालू असता गंभीर प्रतिकार यंत्रणा होण्यास तोंड ध्यावे लागते. याला लेप्रि रिॲ.क्शन असे म्हणतात. प्रतिजैविकामुळे एम लेप्रि जिवाणूच्या पेशीपटलावरील प्रथिनामुळे शरीराची प्रतिकार यंत्रणा कार्यांवितकाऱ्यांवित होते. काहीं व्यक्तीमध्ये प्रतिपिंड आणि एम लेप्रि च्या प्रतिजनाबरोबर एकत्र येतात त्यामुळे त्वचेवर नव्याने चट्टे येणे आणि चेता तंतूंची टोके नष्ट होणे असे होऊ शकते. या प्रकारास इरिथेमा नोडोसम लेप्रोसम म्हणतात. कॉर्टिसोन औषधांचा वापरआणि थॅलिडोमाइड चा वापर केल्यास लेप्रा रिॲेक्शन आटोक्यात येते. काहीं रुग्णामध्ये उअपचारादरम्यान झालेले तीव्र आंत्र व्रण त्वचा रोपणाने बरे होतात.
 
==पूर्वानुमान==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुष्ठरोग" पासून हुडकले