"कॅमेरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
ओळ १:
'''कॅमेरा''' हे प्रकाशाच्या सहाय्यानेसाहाय्याने [[छायाचित्रे]] ([[क्षणचित्रे]] किंवा [[चलचित्रे]]) टिपण्याचे एक यंत्र आहे. पूर्वी अख्खी काळोखी खोली चित्रपटल म्हणून वापरून तिच्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. [[लॅटिन]] भाषेत या रचनेस ''camera obscura'' (उच्चार : कॅमेरा ऑब्स्क्युरा), अर्थात 'काळोखी खोली' म्हणतात. ''कॅमेरा ऑब्स्क्युरा'' या शब्दापासून ''कॅमेरा'' या शब्दाची व्युत्पत्ती झाली. [[दृश्य वर्णपट|दृश्य वर्णपटातील]] उजेड किंवा इतर [[विद्युत चुंबकीय वर्णपट|विद्युत चुंबकीय वर्णपटातील]] प्रकाशतरंगांच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो.
 
[[फोटोग्राफी]] म्हणजे छायाचित्रण. खरे तर प्रकाशचित्रण हा शब्द अधिक संयुक्तिक ठरेल, कारण फोटो काढताना छायेपेक्षा प्रकाशाचा अधिक विचार आणि वापर केला जातो. प्रकाशसंवेदी पृष्ठभागावर स्थिर किंवा गतिमान चित्रांची निर्मिती करणे म्हणजेच फोटोग्राफी किंवा छायाचित्रण. या प्रकाशसंवेदी पृष्ठभागासाठी रासायनिक लेप चढवलेली फिल्म/कागद किंवा विद्युत (इलेक्ट्रॉनिक) संवेदक वापरला जातो. या संवेदी पृष्टभागावर विशिष्ट कालावधीपुरता प्रकाश पडला की त्याची प्रतिमा कागदावर उमटते. हा कालावधी, प्रकाशाची तीव्रता इत्यादी परिमाणे नियंत्रित करण्याची प्रतिमा एका डब्यात बसवलेली असते आणि त्या डब्यालाच आपण कॅमेरा असे म्हणतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅमेरा" पासून हुडकले