"रामकृष्ण विठ्ठल लाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ४:
लाडांचा जन्म [[इ.स. १८२२|१८२२]] साली तत्कालीन पोर्तुगीज [[गोवा|गोव्यात]] मांद्रे गावी, एका सामान्य [[गौड सारस्वत ब्राह्मण|सारस्वत]] कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची [[बुद्धिबळ|बुद्धिबळातील]] चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या [[एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन]] विद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले. वडिलांपश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ [[नारायण दाजी लाड|नारायण]] यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाडदेखील शिकून पुढे डॉक्टर बनले.<br />
 
शालेय शिक्षणानंतर लाडांना एल्फिन्स्टन विद्यालयातच शिकवण्याची नोकरी मिळाली. या काळात त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ्मय अभ्यासले व संस्कृत साहित्यिकांच्या जीवनकाळाबद्दल, कालनिश्चितीबद्दल, तसेच [[गुप्त साम्राज्य|गुप्तकालीन]] इतिहासाबद्दल त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. [[इ.स. १८५०|१८५०]] साली वैद्यकीचा अभ्यासक्रम पुरा करणार्‍याकरणाऱ्या पदवीधरांच्या पहिल्या तुकडीत ते होते.
 
[[इ.स. १८५१|१८५१]] साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले. त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विधवा पुनर्विवाह व स्त्रीशिक्षण यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने सहभाग घेतला. [[इ.स. १८६९|१८६९]] व [[इ.स. १८७१|१८७१]] सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.