"मॅक्झिम गॉर्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: cy:Maxim Gorki
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ४१:
[[इ.स. १९०५|१९०५]] सालच्या फसलेल्या राज्यक्रांतीच्या काळात तुरूंगामध्ये असताना गॉर्कीने सूर्याची पिल्ले हे नाटक लिहिले. या नाटकाची गोष्ट जरी १८६२ सालात दाखवली असली तरीही ते खरेतर तेव्हाच्या सद्य परिस्थितीवरच आधारित होते. याच वर्षी पुढे गॉर्कीने अधिकृतपणे [[बोल्शेविक]] पक्षात प्रवेश केला.
 
[[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] काळात गॉर्कीचे [[पेट्रोग्राड]] (रशियन पेत्रोग्राद) येथील घर बोल्शेविक पक्षाचे कार्यालय म्हणून वापरण्यात आले. परंतु या काळात त्याचे [[साम्यवाद|साम्यवाद्यांबरोबरचे]] संबंध हळूहळू बिघडू लागले. [[इ.स. १९१७|१९१७]] सालच्या [[ऑक्टोबर क्रांती]]नंतर त्याने लिहिले "लेनिन व [[ट्रॉट्स्की]] यांना [[स्वातंत्र्य]] व [[मानवाधिकार]] याची कल्पनादेखील नाही. सत्तेच्या जहाल विषाने त्यांना कधीच भ्रष्ट करून टाकले आहे. ज्या लाजिरवाण्या रितीने त्यांनी [[भाषणस्वातंत्र्य]] व लोकशाहीला प्रिय असणार्‍याअसणाऱ्या इतर सर्व नागरी स्वातंत्र्यांचा निरादर केला आहे त्यावरून हे स्पष्ट दिसते." लेनिनने [[इ.स. १९१९|१९१९]]मध्ये गॉर्कीला लिहिलेल्या पत्रांमध्ये धमक्या आहेत: "माझा तुला सल्ला - तुझी परिस्थिती, तुझी मते, तुझी कृत्ये बदल नाहीतर आयुष्य तुझ्यापासून दूर जाईल."
 
[[इ.स. १९२१|१९२१]] च्या ऑगस्टमध्ये गॉर्कीचा मित्र व लेखक [[निकोलाय गुमिल्योव]] याला पेट्रोग्राडमध्ये गुप्त पोलिसांनी त्याच्या राजसत्तेला असलेल्या पाठिंब्यामुळे अटक केली. गॉर्कीने स्वतः घाईने मॉस्कोला जाऊन त्याच्या सुटकेसाठीचे पत्र स्वतः लेनिनकडून मिळवले. परंतु पेट्रोग्राडला परतल्यावर त्याला समजले की गुमिल्योवला अगोदरच गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. या घटनेनंतर ऑक्टोबरमध्ये गॉर्कीने प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने [[इटली|इटलीला]] स्थलांतर केले, कारण होते [[क्षयरोग]].
 
[[अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन]]च्या म्हणण्यानुसार गॉर्कीच्या सोवियत संघात परतण्याची कारणे भौतिक होती. इटलीमध्ये [[सोरेंटो]] येथे गॉर्कीला ना पैसा ना मान अशा परिस्थितीमध्ये रहावे लागत होते. [[इ.स. १९२९|१९२९]] नंतर त्याने सोवियत संघाच्या अनेक वार्‍यावाऱ्या केल्या. [[इ.स. १९२९|१९२९]] मध्ये त्याने [[सोलोव्स्की]] बेटावरील [[श्रमतुरुंग|श्रमतुरुंगास]] भेट दिली व श्रमतुरुंगांच्या पद्धतीबद्दल स्तुतीपर लेख लिहिला. एव्हाना श्रमतुरुंगांच्या पद्धतीस पाश्चिमात्य देशांमध्ये अगोदरच वाईट नाव मिळाले होते. अखेर [[इ.स. १९३२|१९३२]]मध्ये [[जोसेफ स्टालिन|जोसेफ स्टालिनने]] गॉर्कीला स्वतः सोवियत संघात परतण्याचे निमंत्रण दिले.
 
[[फासीवाद|फासीवादी]] इटलीमधून गॉर्कीचे परतणे ही सोवियत संघाच्या दृष्टीने प्रचाराची मोठीच संधी होती. त्याला "ऑर्डर ऑफ लेनिन" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला राहण्यास घरे देण्यात आली व मॉस्कोमधील एका रस्त्यास त्याचे नाव देण्यात आले.