"जिम कॉर्बेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: uk:Джим Корбетт
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
'''जिम कॉर्बेट''' ([[इ.स. १८७५]]-[[इ.स. १९५५]]) हे नरभक्षक [[वाघ]] व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार जिम यांनी केली.
 
एडवर्ड जेम्स "जिम" कॉर्बेट यांचा जन्म [[जुलै २५]], [[इ.स. १८७५]] रोजी [[हिमालय|हिमालयाच्या]] कुमाऊँ पर्वत रांगांच्या खोर्‍यातखोऱ्यात वसलेल्या [[नैनिताल]] (सध्याचे [[उत्तराखंड]] राज्य) येथे झाला. ते क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे आठवे अपत्य होते. जिमच्या जन्मा आधी त्यांचे वडील क्रिस्टोफर यांना नैनिताल येथे पोस्ट मास्तर म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे एक घर कलाढुंगी येथेही होते. उन्हाळी सुट्यांसाठी सर्व कुटुंबिय तेथेच वास्तव्यास असत. लहानपणापासून जिम यांना वन्यजीवांविषयी आकर्षण होते. ते दिवसचे दिवस एका झाडाला लटकून जंगलात घडणार्‍याघडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यांनी टिपत. या सवयीचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर जिमचे मोठे भाऊ टॉम यांना नैनिताल येथील पोस्टातच नोकरी मिळाल्याने समस्त कुटुंबिय तेथेच राहिले.
 
जिम यांचे शालेय शिक्षण नैनितालच्या ओक ओपनिंग्स स्कुल मध्ये तर उच्च शिक्षण तेथीलच सेंट जोसेफ कॉलेज मध्ये झाले. पदवीनंतर जिम यांना बंगाल आणि वायव्य रेल्वेच्या पंजाब मध्ये नोकरी मिळाली.
 
मूळचे शिकारी असलेले जिम कॉर्बेट यांना लवकरच जाणवले की जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकी ऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले [[वाघ]] आणि [[बिबट्या|बिबटे]] यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १,५०० लोकांना मारणार्‍यामारणाऱ्या डझनभर वाघ आणि बिबट्यांना त्यांनी मारले. चंपावतचा नरभक्षक वाघ यातील ४३६ लोकांना मारणारा तर पणरचा नरभक्षक बिबट ४०० लोकांना मारणारा होता. या आणि अशाच इतर नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली.
 
जिम कॉर्बेट यांच्या दूर दृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून [[अभयारण्य|अभायारण्ये]] घोषीत करण्यात आली. त्यातील पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली [[राष्ट्रीय उद्यान]] घोषीत करण्याचा मान स्वतः जिम यांचाच. याच राष्ट्रीय उद्यानाचे १९५७ साली [[कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान]] असे नामांतरण करण्यात आले.