"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
छो
Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो
छो (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या))
चेतासंस्था किंवा मज्जासंस्था हा एक वैशिष्ट्यपूर्ण चेतापेशींचा समूह आहे. चेतापेशींच्या साहाय्याने शरिरातील क्रियांची व्यवस्थित जुळणी होते. शरिरातील सर्व भागांकडे आवश्यक संदेश पाठविणे आणि ज्ञानेंद्रियाकडून आलेले संदेश ग्रहण करणे हे चेतासंस्थेचे कार्य आहे. बहुतेक सर्व प्राण्यांमध्ये चेतासंस्थेचे दोन भाग असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेतासंस्था. मानवासारख्या पृष्ठवंशी प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू, मज्जारज्जू, आणि नेत्रपटल (रेटिना) यांचा समावेश आहे. परीघवर्ती मज्जासंस्थेमध्ये संवेदी चेतापेशी, गुच्छिका (चेतापेशींचा समूह ) आणि चेता यांचा समावेश असतो. मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्था परस्परांशी जटिल चेतामार्गाने जोडलेले असतात. चेतापेशींचा आणखी एक भाग अनुकंपी चेता तंत्र (सिंपथॅटिक नर्व्हस सिस्टिम), उदर पोकळीताल अवयवांचे नियंत्रण मस्तिष्क चेतामधील प्राणेशा चेताद्वारे (व्हेगस) स्वतंत्रपणे करते.
 
चेतापेशी इतर चेतापेशींना विद्युत रासायनिक पद्धतीने संदेश पाठवितात. हे संदेश चेतापेशीच्या अक्षतंतूमधून प्रवास करतात. अक्षतंतूच्या टोकास अक्षीय गुंडी नावाचा फुगीर भाग असतो. असतो दोन चेतापेशी अनुबंधामधून संपर्कात येतात. अनुबंधामध्ये आलेल्या आवेगामुळे चेतापेशी उद्दीपित, अवरोध किंवा संस्करित होतात. संवेदी चेतापेशी प्रत्यक्ष संदेश मिळाल्यानंतर उद्दीपित होतात. संवेदी चेतापेशी मध्यवर्ती चेता संस्थेकडे किंवा स्नायूकडे संदेश पाठवतात. बहुघा हे संदेश शरीराच्या ज्ञानेंद्रियाकडून किंवा बाह्य शरीरबाह्य बदलाशी संबंधित असतात. प्रेरक चेतापेशी मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये आणि गुच्छिकेमध्ये असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि स्नायू किंवा एखाद्या कार्य करणार्‍याकरणाऱ्या अवयवास अगर ग्रंथीस, प्रेरक चेतापेशी जोडलेल्या असतात. चेतापेशीच्या आणखी एका प्रकारास सहयोगी चेतापेशी असे म्हणतात. पृष्ठवंशी (कशेरुकी) प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतापेशींची संख्या सर्वाधिक असते. मध्यवर्ती चेतापेशींकडे सर्व संवेदी, प्रेरक आणि सहयोगी चेतापेशींचे बंध असतात. या सर्वपेशींच्या परस्पर मेळामुळे बाह्य परिसरातील स्थितीचे ज्ञान प्राण्यास होते. प्राण्याचे वर्तन ज्ञानावर आधारित असते. चेतापेशींशिवाय मज्जासंस्थेमध्ये सहयोगी पेशी (ग्लायल पेशी) असतात. चेतापेशीना आधार देणे आणि चेतापेशीच्या चयापचय गरजा पूर्ण करणे हे सहयोगी पेशींचे कार्य आहे
 
बहुतेक सर्व बहुपेशीय प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. पण त्यांच्या रचनेमध्ये बरीच विविधता आढळते. स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्था नाही. पण स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्थेसदृश (होमोलॉग) असणार्‍याअसणाऱ्या जनुकामध्ये चेतासंस्थेशी संबंधित कार्याचा उगम आढळतो. अगदी प्राथमिक स्वरूपाची शारीरिक हालचाल नियंत्रित करणे हे स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये दिसते. जेलिफिश आणि हायड्रा (जलव्याल) सारख्या आंतरगुही संघातील अरीय सममित प्राण्यामध्ये चेतासंस्था प्राथमिक चेतापेशींच्या विस्कळीत जाळ्याच्या स्वरूपात असते. बहुपेशीय द्विपार्श्वसममित प्राण्यामध्ये पृष्ठवंशी (कशेरुकी ) आणि अपृष्ठवंशी (अकेशेरुकी) प्राण्यांचा समावेश होतो. या सर्वप्राण्यामधील चेतासंस्था एक मध्यवर्ती रज्जू (किंवा दोन समांतर रज्जुका) आणि परीघवर्ती चेता या स्वरूपात असते. द्विपार्श्वसममित सूत्रकृमीसारख्या प्राण्यामधील चेतापेशीं काही शेकड्यापासून मानवी चेतासंस्थेतील पेशींची संख्या शंभर अब्जापर्यंत पोहोचली आहे. चेताशास्त्र म्हणजे चेतासंस्थेचा अभ्यास.
 
स्पंज संघातील प्राण्याहून प्रगत अशा सर्व प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. स्पंज संघातील प्राणी आणि स्लाइम मोल्ड सारख्या प्राणिसृष्टीबाहेरील सजीवांमध्ये सुद्धा पेशीपेशींमध्ये संपर्क यंत्रणा आहे. चेतापेशीपूर्व अशा या यंत्रणेपासून चेतापेशी विकसित झाल्या. जेलिफिश सारख्या अरीय सममित प्राण्यामध्ये चेतापेशींचे विस्कळित जाळे आहे. बहुसंख्येने सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व द्विपार्श्वसममित प्राण्यांमध्ये उत्क्रांत झालेली चेतासंस्था कॅंब्रियन कालखंडापासून पाचशे दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झाली.
६३,६६५

संपादने