"चारू मजुमदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
'''चारू मुजुमदार''' (१९१८-१९७२) [[भारत|भारतात]] नक्षलवादाचा प्रसार करणारे चारू मुजुमदार यांचा जन्म [[पश्चिम बंगाल|पश्चिम बंगालच्या]] [[सिलीगुडी]] येथे एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. [[कार्ल मार्क्स|मार्क्स]] आणि [[माओ त्से तुंग|माओ]] यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि समाजात होणार्‍याहोणाऱ्या अत्याचारांचा विरोध करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पर्याय त्यांनी स्वीकारला. अशा क्रांतीशिवाय वर्ग, वर्ण द्वेष संपविता येणार नाही असा त्यांना ठाम विश्वास होता.
 
 
चारू मुजुमदार यांचे वडील भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. आपणही काही करावे असे वाटत असल्याने चारू यांनी १९४० च्या सुमरास [[साम्यवाद|कम्युनिस्ट]] पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून पक्षाच्या विविध जबाबदार्‍याजबाबदाऱ्या सांभाळत ते समाजातील वर्ग, वर्ण द्वेषांबद्दल कार्य करीत राहिले. १९६४ साली कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन झाले, चारू मार्क्सवादी पक्षात गेले. १९६७ साली काँग्रेस पक्षाचा पराभव झाला, सगळीकडे त्यांची पीछेहाट सुरू झाली. त्यावेळी मुजुमदार यांना लोकशाही मार्गापेक्षा सशस्त्र उठावाला प्राधान्य द्यावे असे वाटू लागले. त्यांच्या या विचारांमुळे त्यांचे त्यांच्या पक्षाशी मतभेद होऊ लागले. तरीही १९६७ साली बंगालच्या सुमारे ६० खेड्यांचा समावेश असलेल्या '''नक्षलबाडी''' या भागात सशस्त्र उठाव चारू यांनी घडवून आणला आणि नक्षलबाडी क्षेत्र स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले.