"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hi:गजानन महाराज
ओळ ३:
आधुनिक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक [[संत]].
==महाराज कोण होते, कोठून आले?==
महाराज कोण होते, कोठून आले?. (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करीत, तसेच त्यांना वेदश्रवणदेखील फार आवडे.) <ref name=dasganu />. माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते [[शेगांव]] जि. [[बुलढाणा]] येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले<ref>http://neelkant.wordpress.com/</ref> . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या [[पत्रावळ|पत्रावळीतील]] शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात [[दासगणू महाराज|दासगणूंनी]] लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"<ref name=dasganu>लोक त्यांना अजन्मा अथवा अयोनिसंभवा असेसुद्धा म्हणतात{{संदर्भ हवा}}. [[श्री गजानन विजय]] या ग्रंथामधे त्यांचे चरित्र [[दासगणू महाराज]] यांनी लिहून ठेवले आहे.</ref> जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घर | झाले असे पंढरपूर | लांबलांबूनीया दर्शनास येती | लोक ते पावती समाधान ||,"
बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात.
बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले.
 
===सद्‌गुरू===
ओळ १५:
 
===शरीरयष्टी===
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्र विहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देह चर्या. लांब लांब पावले टाकीत सदान्‌कदा घाईघाईत धावल्या प्रमाणे भासणारी चाल गती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी ( कपडा ) गुंडाळलेली असे..<ref name="maharashtratimes.indiatimes.com">http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2821071.cms</ref>
 
===अन्नसेवन===