"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३४:
[[इ.स. १८८५]]साली त्यांनी [[सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]], [[मुंबई]] येथे प्रवेश घेतला. [[इ.स. १८९०]]साली जे.जे.तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, [[बडोदा]] येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.
 
त्यांनी [[गोध्रा]] येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्र्यात झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी [[राजा रविवर्मा|राजा रविवर्म्यासोबतरविवर्मांसोबत]] काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला [[जर्मनी|जर्मनीची]] वारी केली.
 
== कारकीर्द ==