"योहानेस श्टार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nn:Johannes Stark)
छो
 
== नाझी समाजवादा बरोबरचे नाते. ==
[[चित्र:Adolfmaal.jpg|thumb|left|१९३२ साली श्टार्क यांनी डॅनीश भाषेत भाषांतरीतभाषांतरित केलेल्या "[[अ‍ॅडॉल्फ हिटलर|एडॉल्फ हिटलर]] : एम्स एन्ड पर्सनॅलीटी या पुस्तकाचे मुखपृष्ठ"]]
 
नाझी राजवटीत, स्टार्क यांनी जर्मन भौतिकशास्त्रात हिटलरशाही गाजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी [[फिलीप लेनार्ड]] यांच्या बरोबरीने "डॉईश फीजीक" म्हणजेच "जर्मन भौतिकशास्त्र" या नावाने मोहीम चालू केली. या मोहीमेचे उद्दीष्ट ज्यू शास्त्रज्ञांचे भौतिकशास्त्र जर्मन शास्त्रज्ञांच्या भौतिकशास्त्रापेक्षा कसे हीन आहे हे सिध्द करणे होते. ज्यू शास्त्रज्ञ [[अल्बर्ट आइनस्टाइन]] आणि बिगर ज्यू [[वर्नर हायझेनबर्ग]] हे या मोहीमेचे मुख्य लक्ष्य होते. हायजेनबर्गने आईनस्टाईनच्या [[सापेक्षतावाद|सापेक्षतेच्या सिध्दांताचे]] समर्थन केल्यानंतर श्टार्क यांनी आपल्या "दास श्वार्झे कोर्स" या [[एस.एस.]] वर्तमानपत्रातून तो श्वेत ज्यू असल्याची टीका केली होती.
ऑगस्ट २१ १९३४ रोजी श्टार्क यांनी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ [[मॅक्स व्हॉन लोये]] यांना [[नाझी]] पार्टीचे सभासद होण्याचे अन्यथा परिणामांना तयार राहण्याचे धमकीवजा विनंती पत्र पाठविले. पत्राखाली हेल [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]] या घोषणेसह हस्ताक्षर केले. मॅक्स यांनी या धमकीला न बधता आपला नम्र नकार कळविला.
 
१९३४ साली त्यांनी लिहीलेल्या "नॅशनल शोजीयालिस्मस उंड विसेनशाफ्ट" ([[राष्ट्रीय समाजवाद]] आणि विज्ञान) या पुस्तकात जर्मन राष्ट्रवादाचा जोरदार पुरस्कार केला. राष्ट्राची सेवा करणे हेच प्रत्येक जर्मन शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे असे त्यांनी ठासून मांडले आहे. प्रायोगिक विज्ञानावर त्यांनी टीका करून व्यावहारीक युध्दयुद्ध शास्त्रीय विज्ञान, ज्याची त्यावेळी जर्मनीला गरज होती, त्यावर संशोधन व्हावे असा आग्रह त्यांनी केला होता. [[सैध्दांतिक भौतिकशास्त्र]] हा ज्य़ू शास्त्रज्ञांचा पोरखेळ असून त्यावर बंदी घालण्यात आली पाहिजे असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. नाझी जर्मनी ही फक्त शुध्द जर्मन वंशियांची असून इतर वंशीयांना त्यात स्थान नाही अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे.
 
ज्यू शास्त्रज्ञांना विशुध्द नैसर्गिक विज्ञानाची उमज नाही असेही त्यांचे मत होते.
 
१९४७ साली [[दुसरे महायुद्ध|द्वितीय विश्वयुध्दातविश्वयुद्धात]] जर्मनीचा पुर्ण पाडाव झाल्यानंतर युध्दयुद्ध अपराधी म्हणून श्टार्क यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
 
== Publications ==
६३,६६५

संपादने