"साप्ताहिक विवेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २०:
* [[रामजन्मभूमी]] मुक्ती आंदोलनात विवेक या साप्ताहिकाने खास प्रकाशने काढली होती. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घटनांची माहिती गोळा करण्याचे काम या कालखंडात ‘केले गेले. यामुळे बाबरी ढाचा कोसळतानाची छायाचित्रे विवेक साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. याच कालखंडात सुरू झालेल्या [[मंडल आयोग]] आंदोलनातही निश्चित आणि सुस्पष्ट भूमिका मांडणारे लेखन ‘विवेक’मध्ये प्रकाशित झाले. ‘राखीव जागा- का व कशासाठी?’ आणि ‘मंडल आयोग’ या भि.रा. दाते यांच्या दोन पुस्तिका याच काळात प्रकाशित झाल्या. ‘विवेक’चे संपादक दिलीप करंबेळकर यांची अयोध्या आंदोलनाची मीमांसा करणारी पुस्तिका याच काळात प्रकाशित झाली.
 
* [[इ.स. १९८७]] साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] ‘रिडल्स ऑफ राम अ‍ॅन्डॲन्ड कृष्ण’ या विषयावरून वादंग उठले. दलित आणि दलितेतर अशी समाजाची विभागणी अधिक तीव्र झाली. साप्ताहिक ‘विवेक’ने समन्वयाची भूमिका घेतली. याच काळात ‘राम विरुद्ध आंबेडकरि समाज पोखरणारा वाद’ ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. तसेच ‘विवेक’च्या प्रयत्नांनी [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] द्वारे, महाराष्ट्रानेही रिडल्सवादात समाजाला जोडणारी भूमिका घेतली. रिडल्सवादात सन्मानाने जो तोडगा निघाला, त्यात ‘विवेक’ची भूमिका महत्त्वाची ठरली असा दावा केला जातो.
 
* या काळात बाळासाहेब गायकवाड यांचे ‘ख्रिस्ती महार’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची मुखपृष्ठकथा ‘विवेक’ने केली होती. या मुखपृष्ठकथेमुळे शिवसेनाप्रमुख [[बाळासाहेब ठाकरे]] यांनी ख्रिस्ती महार हा विषय उचलून धरला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय विषयसूचीवर एक वर्ष हा विषय गाजत राहिला. [[इ.स. १९८७]] साली [[डॉ. गंगाधर पानतावणे]] समरसता परिषदेला आले म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीने त्यांना बहिष्कृत केले. त्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी ‘विवेक’ने उपलब्ध करून दिली होती.