"रेब्रांट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ba:Рембрандт
छोNo edit summary
ओळ २९:
रेम्ब्रावर करावागिओ व इतर अनेक इटालियन चित्रकारांचा प्रभाव होता. तो चित्रकलेचा शिक्षक देखील होता.
 
सन १६३१ मधे लायडनमधे त्याच्या चित्रशाळेची भरभराट होत असतांना तो ऍमस्टरडॅमला आला. तो हॉलंडचा सर्वात प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार होता. धार्मिकचित्रे आणि अनेक व्यक्तिचित्र काढण्याची कामे त्याला मिळाली. मानाचे आणि संपन्नतेचे जीवन जगत असतांना त्याने १६३४ मधे सास्कीया या सुंदरीशी लग्न केले. पुढे त्याच्या अनेक चित्रांची ती विषय होती. या काळातील त्याच्या चित्रांत प्रकाशाच सुंदर आणि तीव्र वापर केलेला आढळतो. व्यक्तिचित्रांखेरीज तो भूचित्रे (देखावे) आणि धातूंवर कोरीव चित्रे काढण्यात प्रसिद्ध पावला. त्याने स्वत:चीस्वतःची देखील अनेक चित्रे काढली. एका अंदाजानुसार त्याने ५० ते ६० व्यक्तिचित्रे काढली.
 
१६३६ पासून पुढील काळात त्याच्या चित्रांचे विषय शांत, गंभीर आणि वैचारिक वाटतात. पुढील चार वर्षांत त्याची चारपैकी तीन मुले लहानवयात मरण पावली, तर १६४२ मधे त्याच्या पत्नीचे निधन झाले. १६३० ते १६४०च्या दशकांत त्याने प्रामुख्याने भूचित्रे(देखावे) आणि कोरीवचित्रे काढली. 'द नाईट वॉच' हे त्याचे प्रसिद्ध भूचित्र (देखावा) आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/रेब्रांट" पासून हुडकले