"भौतिकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:CollageFisica.jpg|300px|thumb|भौतिकशास्त्राच्या अभ्यासकक्षेतील विषयांशी संबंधित काही दृश्ये]]
पुरातन असणारी ही ज्ञानशाखा खगोलशास्त्राच्या त्यातील समावेशामुळे कदाचित सर्वात प्राचीन ठरते. भौतिकशास्त्र त्याच्या [[गणित]] व [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञानाशी]] जोडल्या गेलेल्या संबंधांमुळे पूर्वीपासुनच फार जड व सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे समजले गेले आहे. परंतु भौतिकशास्त्राचे मानवी प्रगती (विशेषतः गेल्या दोन शतकांमधील) वृद्धिंगत करण्यामागील योगदान मात्र वादातीत व एकमेवाद्वितीय आहे.

सुमारे दोन सहस्र वर्षे भौतिकशास्त्र हे रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित अशा इतर शास्त्रशाखांच्या बरोबरीने तत्त्वज्ञानाचा भाग समजले जात असे. परंतु सोळाव्या शतकात प्रारंभ झालेल्या वैज्ञानिक क्रांतीमुळे या सर्व शाखांना समर्पकपणे त्यांच्या हक्काचे स्वतंत्र अस्तित्व मिळाले. भौतिकशास्त्र तरीही इतर शास्त्रशाखांच्या कक्षांमध्ये आपले कार्यक्षेत्र विस्तारीत करते, उदाहरणार्थ [[जीवभौतिकशास्त्र]] (इंग्रजी: ''biophysics'') किंवा [[पुंजरसायनशास्त्र]] (इंग्रजी: ''quantum chemistry''). अशा आंतरशाखीय संशोधनक्षेत्रांमुळे सर्वच शास्त्रशाखांच्या कक्षा आता ठळक न राहता विरळ झाल्या आहेत. भौतिकशास्त्रातील नवीन संकल्पना बरेचदा इतर शास्त्रशाखांमधील मूलभूत तत्त्वे समजण्यास मदत करतात.

मूलभूत संकल्पनांवर आधारित असणार्‍या नविन तंत्रशाखा विस्तारित करण्यात भौतिकशास्त्र मोठे योगदान देते. विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासातूनच पुढे दूरचित्रवाणी, घरगुती वापराची विद्युत उपकरणे, संगणक, भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) या तंत्रशाखा विकसित झाल्या व मानवी जीवन अक्षरशः नाट्यमयरित्या उजळून निघाले. ऊर्जागतिशास्त्र (इंग्रजी: ''thermodynamics'') प्रगत होण्याने औद्योगिक क्रांतीचा पाया रचला गेला. यंत्रशास्त्र व गतिशास्त्र (इंग्रजी: ''mechanics and dynamics'') यातील प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नांमुळे उपयोजित गणित व कलन (इंग्रजी: ''calculus'') यांचा विकास प्रेरित झाला.

== इतिहास ==
ओळ १३:

मध्ययुगीन युरोपमध्ये पुर्वार्धात केपलर आणि ग्ॅलिलियोगॅलिलिओ व उत्तरार्धात प्रामुख्याने न्यूटन यांनी प्रायोगिक व मोजणी पद्धती वापरून विविध नियम मांडले जे आज भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र यातील मुलभूत नियम मानले जातात. यातूनच अभिजात यामिकी (इंग्रजी: ''Classical mechanics'') ही भौतिकशास्त्राची प्रमुख शाखा म्हणुन स्थापित झाली.

आधुनिक भौतिकशास्त्र (इंग्रजी: ''Modern Physics'') विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात उदयाला येऊन लोकप्रिय झाले ते प्रामुख्याने आईनश्टाईनआइनस्टाइन यांनी केलेल्या सापेक्षता (इंग्रजी: ''relativity'') व पुंजवाद (इंग्रजी: ''quantum theory'') या क्षेत्रांतील असाधारण कामगिरीमुळे.

== प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ==