"मुळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: tt:Редис; cosmetic changes
ओळ ५:
 
{{विस्तार}}
चरक संहितेत मुळ्याला 'अधम कंद' असे म्हटले असून, त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत. मुळ्याच्या शेंगेला ‘डिंगरी' असे म्हणतात. गुजराथीत या शेंगेला ‘मोगरी' म्हणतात. या शेंगांचीही भाजी आणि रायते बनवले जाते. मुळ्याच्या बीमधून तेल निघते. त्याचा वास आणि स्वाद मुळ्यासारखाच असतो. हे तेल पाण्यापेक्षा जड आणि रंगहीन असते. मुळ्याच्या गोलचकत्यांवर थोडे मीठ भुरभुरून थंडीमध्ये सकाळी परोठ्याबरोबर किंवा भाकरीबरोबर खाल्ले जातात.. काठेवाडी गाठियांबरोबरसुद्धा मुळा स्वादिष्ट लागतो.
 
मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. कोवळ्या मुळ्याचे लोणचे किअरतात.. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. कित्येक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी करतात. तर काही लोक त्याच्या मुठिया (मुटकुळी) आणि थालिपीठेही करतात.
ओळ १८:
* बारीक चिरलेल्या मुळ्याच्या पाल्यात मीठ घालून पाला चांगला मळावा. मळल्यावर मुळ्यालापाणी सुटते. तो पाला पिळून पाणी वेगळं काढावे.त्याच पाण्यात भाजी शिजवावी. बाहेरचे पाणी घालून भाजी शिजवल्याने भाजीची चव बिघडते. या पाण्यातभाजी शिजवताना मीठ कमीच घालावे. ही भाजी पूर्ण शिजल्यावर त्यात वरून खोबरेल तेल घालावे.
* मुळ्याचे थालिपीठही रुचकर लागते. दोन मध्यम आकाराचे मुळे किसून घ्यावेत. किसल्यावर त्यांचा रस पिळून घ्यावा. कीस पिळल्यावर त्यातील उग्रपणा कमी होतो. किसात एक बारीक चिरलेला कांदा, एक वाटी तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन, अर्धा चमचे धणे-जिरे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा साखर, ओल्या खोबरयाचे पातळ तुकडे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ असे सगळे साहित्य एकत्र करून गालावे. गरजेपुरते पाणी टाकून मिश्रण मळून घ्यावे. प्लास्टिकच्या कागदावर किंवा केळीच्या पानांवर तेलाचा हात लावून मळलेल्या पिठाची थालिपिठे थापावी. तव्यावर तेल गरम करून ती मंद आचेवर भाजावी. दही किंवा लोण्यासोबत पानात वाढावीत..
 
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग :भाज्या]]
 
[[ar:فجل]]
Line ८७ ⟶ ८६:
[[to:Lētisifoha]]
[[tr:Turp]]
[[tt:Редис]]
[[uk:Редька]]
[[ur:لال مولی]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मुळा" पासून हुडकले