"समीक्षा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६७:
‘विचारांचे प्रवाहीपण नाकारणे म्हणजे त्याचे अस्तित्वच नाकारणे आणि पर्यायाने संस्कृतीचा विकासही नाकारणे होय.’ असे ते मानतात. लेखक, कवी हा प्रथमत: विचारभावनांच्या आविष्काराने बांधलेला असतो. म्हणूनच त्याची जीवनविषयक जाणीव व्यापक आणि सर्वस्पर्शी असणे इष्ट असते. बांधिलकी, सामिलकी ही लेखकाच्या सामाजिक विचारभावनांशी संबधित असते. निसर्गसौंदर्याच्या बाबतीतही त्याची प्रतिक्रिया वेगळी असल्याचे दिसत नाही. ‘समाज आणि व्यक्ती यांच्यातील सबंधक्षेत्र हेच सामिलकीचे व बांधिलकीचे प्रमुख प्रभावक्षेत्र आहे, असे ते मानतात.
साहित्याचे सामाजिक प्रयोजन
कुसुमाग्रजांच्या मते, साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी, क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते. तसेच साहित्य लहानमोठ्या परिवर्तनास आवश्यक अशी मनोभूमिका निर्माण करू शकते. केवळ कलात्मक प्रेरणेचा आग्रह धरणे म्हणजे साहित्याच्या स्वाभाविक विस्ताराला मर्यादा घालणे होय. ही प्रेरणा सौंदर्यात्मक (बालकवी), भावनात्मक (खांडेकर), संशोधनात्मक (गाडगीळ-गोखले), तात्विक (खाडिलकर), पारमार्थिक (संतकाव्य) अशी जशी असू शकते तशी ती क्रांतिकारक असू शकते. त्यांच्या मते, “सृष्टीतील सौंदर्य खरे तेवढेच सामाजिक जीवनातील प्रक्षोभही खरे आहेत. श्रद्धा प्रेमावर परमेश्वरावर जशी असू शकते तशी ती एखाद्या राजकीय व सामाजिक तत्वज्ञानावरतत्त्वज्ञानावर असू शकते” (रूपरेषा, पृ.५३)
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/समीक्षा" पासून हुडकले