"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या, ऐतिहासिक कादंबऱ्या, कथासंग्रह या बद्दल माहिती दिली
ओळ ५:
 
‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे ते काही काळ सहसंपादक होते. कोरेगावहून त्यांचे स्वत:चे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.
 
न पटणारी गोष्ट (१९२३), सुखाचा मूलमंत्र (१९२४), पहाटेपूर्वींचा काळोख (१९२६), उमज पडेल तर (१९३९), एकटी (१९४५) या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यापैकी अजिंक्यतारा (१९०९), संधिकाल (१९२२), लांच्छित चंद्रमा (१९२५) आणि रजपूतांचा भीष्म (१९४९) या विशेष उल्लेखनीय आहेत. आराम-विराम (१९३४) आणिबनारसी बोरे हे त्यांचे कथासंग्रह. यांशिवाय गृहसौख्य (१९३१), आयुष्याचा पाया (१९४६), कुर्यात् सदा मङ्गालम् (१९४९) यांसारख्या ग्रंथांतून संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिक नीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन इ. विषयांसंबंधी विवेचन त्यांनी केले आहे. त्यांनी सारेच लेखन बोधवादी भूमिकेतून केलेले आहे. त्यांची शैली प्रसादपूर्ण आणि प्रसन्न आहे.
 
त्यांच्या कथांवरून काही चित्रपट बनले आहेत. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.