"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५८:
हायड्रोजनच्या [[अणू|अणूची]] रचना अतिशय साधी असते. त्याच्या [[अणुकेंद्र|अणुकेंद्रात]] फक्त एक [[प्रोटॉन]] असतो व त्याभोवती एक [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] फिरत असतो. हायड्रोजन अणूच्या अतिशय साध्या रचनेमुळे आणि अणूपासून निघणाऱ्या व शोषल्या जाणाऱ्या प्रकाशपटलाच्या अभ्यासामुळे अणुरचनेचा सिद्धान्त बनवण्याच्या कामात हायड्रोजनची खूप मदत झाली. तसेच, हायड्रोजनचा [[रेणू]] H<sub>2</sub> ह्याची व त्याचा [[कॅटआयन]] H<sub>2</sub><sup>+</sup> ह्याचीही रचना एकदम साधी असल्याने [[रासायनिक बंध|रासायनिक बंधाचे]] गुणधर्म पूर्णपणे समजून घ्यायलाही त्याचा उपयोग झाला. हायड्रोजन अणूचा पुंज-भौतिकी अभ्यास मध्य-१९२० च्या दशकात झाला, त्यानंतर वरील सिद्धान्तांचाही विस्तार केला गेला.
 
सुरुवातीस अभ्यासल्या गेलेल्या पुंज-भौतिकी परिणामांपैकी एक परिणाम [[जेम्स क्लार्क मॅक्सवेल|मॅक्सवेलने]], पूर्ण पुंज-भौतिकी सिद्धान्त मांडण्याच्या जवळजवळ अर्धे शतक अगोदर हायड्रोजन अणूच्या संदर्भातच लक्षात आणून दिला होता, पण त्या वेळेस त्याचे पूर्णपणे स्पष्टीकरण सापडले नव्हते. मॅक्सवेलच्या निरीक्षणाप्रमाणे हायड्रोजनची [[विशिष्ट उष्णता क्षमता]] ([[:en:specific heat capacity|specific heat capacity]]) साधारण तापमानच्या खाली इतर द्वि-अणू वायूंपेक्षा बरीच वेगळी होती, आणि ती क्रायोजेनिक तापमानांना एक-अणू वायूंच्या उष्णता क्षमतेच्या जवळ जात होती. पुंजवादानुसार ही वर्तणूक हायड्रोजनच्या फिरणार्‍याफिरणाऱ्या (पुंजित) ऊर्जा पातळींमधील अंतरामुळे झालेली आहे. हायड्रोजनच्या अतिशय कमी भारामुळे त्यातील ऊर्जा पातळ्या जास्तच दूर असतात. अधिक भारांच्या द्वि-अणू वायूंमध्ये ऊर्जा पातळ्या एवढ्या अलग नसतात, आणि त्यांच्यात वरील परिणाम पहायला मिळत नाही.<ref name="Berman">Berman R, Cooke AH, Hill RW. ''Cryogenics'', Ann. Rev. Phys. Chem. 7 (1956). 1–20.</ref>
 
== उपयोग ==