"जैवविविधता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५४:
 
 
'''औद्योगिक वापर'''
अनेक उद्योगामध्ये सजीवापासून मोठ्या प्रमाणात मिळवलेल्या वस्तूंचा वापर होतो. घरे, कपडा, रंग, रबर आणि इंधन सर्वस्वी सजीवापासून मिळवले जातात. जैवविविधता पाणी, इमारती लाकूड, कागद, तंतू आणि अन्न यांच्या पुन्ह: पुन्ह: निर्मितीसाठी अत्यंत महत्वाची आहे. जैवविविधतेचा –हास म्हणजे आर्थिक नुकसान.
'''छंद, सांस्कृतिक आणि सौंदर्यदृष्टी'''
जैवविविधता आस्तित्वात असण्याने पक्षी निरीक्षण, फुलपाखरे निरीक्षण, वनस्पति आणि प्राण्यांमधील सहसंबंध यांचा अभ्यास असे छंद जोपासता येतात. जंगलातील आडवाटा तुडवणे, फुलांचे ताटवे न्याहाळणे अशा निसर्ग सहलीनी जो आनंद मिळतो तो जैवविविधता नष्ट करण्याने हिरावून घेतला जातो. शंभर वर्षापूर्वी फक्त पुस्तकामध्ये वर्णन केलेला एखादा पक्षी किंवा फुलपाखरू किंवा एखादी औषधी वनस्पति आणि त्याची फुले परत एकदा पहावयास मिळावी याचा आनंद अवर्णनीय आहे. सध्या जंगलामधून केवळ वाघ पहायला किंवा हत्तीवरून जंगल तुडवणे यासाठी सफारी आयोजित केल्या जात आहेत. केनिया सारखा देश सिंह,झेब्रा,आणि, पाणघोडे पहाण्यासाठी जगभरातील पर्यटकाना आकर्षित करतो आहे.
जैवविविधतेमुळे अनेल संगीतकार, चित्रकार, शिल्पी, लेखक आणि कलावंतामध्ये सौंदर्यदृष्टी आलेली आहे. अनेक संस्कृतीमध्ये जैवविविधता टिकवून राहणे म्हणजेच संस्कृति असा दृष्टिकोन उत्पन्न झाला आहे. राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशामध्ये खेजडी झुडूप आणि कृष्णमृग यांच्या रक्षणासाठी बिष्णोई जमातीनी प्राण गमावले आहेत. महराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील अनेक देवस्थानांच्या आश्रयाने वाढलेल्या देवरायामध्ये झाडाचे पानसुद्धा तोडायचे नाही अशा अलिखित नियमामुळे अनेक प्रजाति टिकून राहिलेल्या आहेत.
बागामध्ये शोभेच्या वनस्पति लावणे, वाढवणे, औषधी वनस्पति उद्यान, घरगुति मत्स्यपालन, प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, अशा अनेक व्यबसासायांचा उगम जैवविविधतेमध्ये आहे. सर्वसामान्य व्यक्ती अशा छंदाना मनापासून प्रतिसाद देते. व्यावसायिकपणे दुर्मीळ प्राणी जोपासणे, त्यांना वाढवणे, दुर्मीळ पक्षी सांभाळणे त्याना परत निसर्गामध्ये सोडणे, त्यांचे संवर्धन अशा छंदांचे नेमके मूल्यमापन करणे हे कठीण काम आहे. पण केवळ निसर्गाच्या प्रेमापोटी काहीं संस्था हे काम पदरमोड करून करत आहेत. राजकीय दृष्ट्या ग्रीन पार्टी नावाचा पक्ष 1970 पासून ज्र्मनी,बेल्जियम, स्वीडन मध्ये पर्यावरण रक्षण या अजेंड्यावर काम करतो आहे. आज ही लाट युरोप आणि उत्तर अमेरिकमध्ये एक प्रभावी पक्ष बनला आहे.
 
'''पर्यावरण सेवा'''
जैवविविधतेमुळे अनेक पर्यावरण सेवा उपलब्ध झाल्या आहेत.या सेवा प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष पणे मानवी जीवन सुसह्य बनवतात. हवेच्या घटकांचे संतुलन, गोड्या पिण्याच्या पाण्याचे चक्र, यांचे मूल्यमापन अशक्य आहे. यामधील जैवविविधतेच्या मदतीची रुपयात किंवा डॉलरमध्ये किंमत केल्यास कोणत्याही प्रगत राष्ट्राला ती चुकवता येणार नाही. मृदेमधील अन्न्घटक चक्र, सुपीक जमीन तयार करणे, अशी कामे मानवी प्रयत्नानी करायची ठरवली तर ते अशक्य आहे. केवळ संतुलितपणे ज्या सेवा जैवविविधतेमुळे मिळतात त्या अमूल्य आहेत.एकच उदाहरण द्यायचे तर ते कीटकाद्वारे करण्यात येणा-या परागीभवनाचे द्यावे लागेल. कीटकानी मानवास दिलेली ही देणगी पैसे खर्च करून करवून घ्यायची तर किती रक्कम द्यावी लागेल याचा विचारच केलेला बरा.
 
'''सजीव जाति संख्या'''
जागतिक सजीव वर्गीकरण विभागाने आणि युरोपियन डिस्ट्रिब्यूटेड इंस्टिट्यूट ऑफ टॅक्सॉनॉमी या संस्थानी सजीवांच्या प्रत्येक वर्गातील (फायला) एकूण जातींचा 2010 मधील केलेला अंदाज प्रत्यक्षात असलेल्या जातीहून कितीकरी कमी असावा असे म्हटले आहे.
• 10-30 दशलक्ष कीटक
• 5-10 दशलक्ष जिवाणू
• 1.5 दशलक्ष कवके
• 1.0 दशलक्ष अष्टपाद
• सूक्ष्म जीवांची नक्की संख्या किती याचा अंदाज अजून आलेला नाही. जागतिक सागरी पाण्यातील सूक्ष्म जीवांची पाहणी केल्यानंतर असे आढळून आले की प्लवंगामधील सूक्ष्म जीवामध्ये अधिक विविधता आहे. 2004-2006 मध्ये केलेल्या सूक्ष्म जीवांच्या अभ्यासानंतर सध्या ‘जाति’ या व्याख्येमध्ये ओळखले जाणा-या सजीवाना काहीं मर्यादा आहेत.
सध्याचा जाति विलोपनाचा वेग वाढला आहे. हा वाढलेला वेग ध्यानात घेतला तर कित्येक जाति ओळखण्याआधी विलुप्त होण्याची शक्यता अधिक आहे.
 
'''जाति विलोपनाचा वेग'''
गेल्या शतकात जैवविविधतेमधील घट मोठ्याप्रमाणात लक्षात आली. 2007 मध्ये जर्मन फेडरल प्रशासनातील एक मंत्री सिग्मार गॅब्रिएल यानी सध्या आस्तित्वात असलेल्या प्रजातीमधील 30% प्रजाति 2050 पर्यंत नष्ट होतील असे विधान केले. यापैकी ठावूक असलेल्या वनस्पतिपैकी एक अष्टमांश विलोपनाच्या मार्गावर आहेत. हा विलोपनाचा वेग 140,000 जाति दरवर्षी एवढा प्रचंड आहे. हा धोका मुख्यत्वेकरून पर्यावरणातील असंतुलित बदलामुळे आहे. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या वेगाने विलोपनाचा वेग वाढला आहे यावर बहुतेक वैज्ञानिकांचे एकमत झाले आहे.