"होलोकॉस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: my:ဂျူး သုတ်သင်ရေး စီမံကိန်း
छोNo edit summary
ओळ १:
'''होलोकॉस्ट''' (ग्रीक: ὁλόκαυστος ''होलोकाउस्तोस'' ; शब्दाची फोड: hólos, "संपूर्ण " आणि kaustós, "भाजणे") हे नाव [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धा]]दरम्यान [[नाझी जर्मनी]]कडून करण्यात आलेल्या [[ज्यू लोक]]ांच्या हत्येचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. दुसर्‍या महायुद्धापूर्वी [[युरोप]]ात सुमारे ९० लाख ज्यू निवासी होते ज्यांपैकी २/३ (६० लाख) ज्यू ह्या हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडले. ह्यांमध्ये ३० लाख पुरुष, २० लाख स्त्रिया व १० लाख बालकांचा समावेश होता. जगाच्या इतिहासामध्ये आजतागायत [[ज्यूविरोध]]ाची ही सर्वात भयानक घटना मानली जाते.
 
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]]च्या नेतृत्वाखाली [[नाझी जर्मनी]]ने जर्मन समाजाचे ''शुद्धीकरण'' करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व लोकांचे नष्टीकरण करण्याची योजना आखली. ह्या अंतर्गत जवळजवळ सर्व जर्मन ज्यू लोकांना अटक करून छळछावण्यांमध्ये ({{lang-en|Concentration camps}} डांबले गेले. ह्या छावण्यांमधील दारूण परिस्थिती, उपासमार, रोगराई व अतिश्रमामुळे अनेक ज्यू मरण पावले. [[डखाउची छळछावणी|डखाउ]], [[बुखनवाल्डची छळछावणी|बुखनवाल्ड]], [[ऑश्विझ छळछावणी|ऑश्विझ]] ह्या सर्वात प्रथम उभारलेल्या छळछावण्या होत्या. युद्ध सुरू झाल्यानंतर जसेजसे नाझी जर्मनीने [[पूर्व युरोप]]ातील देश जिंकण्यास सुरुवात केली तसतसे ह्या देशांमधील ज्यू लोकांसाठी नवीन छळछावण्या उभ्या करण्यात आल्या.
 
१९४२ साली ज्यूंच्या सामुहिक कत्तलीसाठी संहारछावण्या<ref>संहारछावणी ({{lang-en|''Extermination camp''}}, ''एक्सटर्मिनेशन कँप'')</ref>उभारण्यात आल्या. ह्या छावण्यांचा उद्देश मोठ्या प्रमाणावर संहार एवढाच होता. ह्या छावण्यांमध्ये कैद्यांना एका मोठ्या बंदिस्त खोलीत डांबून त्या खोलीत विषारी वायू सोडला जात असे.